देशाने युवा अभ्यासू नेता गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST2021-05-17T04:07:01+5:302021-05-17T04:07:01+5:30
राजकारणातून समाजकारण करण्यात राजीव सातव यांची हातोटी होती. एक अत्यंत साधे व मनमिळाऊ व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. मूलभूत ...

देशाने युवा अभ्यासू नेता गमावला
राजकारणातून समाजकारण करण्यात राजीव सातव यांची हातोटी होती. एक अत्यंत साधे व मनमिळाऊ व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. मूलभूत गरजा लक्षात ठेवून त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले. कॉंग्रेस पक्षासोबत त्यांची निष्ठा सर्वांना आठवणीत राहील. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते फारच लोकप्रिय होते. त्यांच्या निधनामुळे कॉंग्रेस पक्षाची तसेच माझी व्यक्तिगत हानी झाली असून माझा एक प्रामाणिक मित्र काळाने हिरावला आहे.
आशिष देशमुख, माजी आमदार
देशाने युवा अभ्यासू नेता गमावला
खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे देशाने एक तरुण, निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू, प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता गमावला असून काळाने एक युवा अभ्यासू नेता हिरावून घेतला आहे. मनमिळाऊ स्वभाव व कुशल संघटक असणाऱ्यास राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी राजकारणात उभी केली.
जयदीप कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी