नागपूरच्या मनोरुग्णालयात रुग्णांच्या नोंदणी शुल्कात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 19:27 IST2017-12-07T19:23:43+5:302017-12-07T19:27:04+5:30

रुग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणाऱ्या  स्थानिक मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे.

Corruption in the registration fee of patients in Nagpur mental hospital | नागपूरच्या मनोरुग्णालयात रुग्णांच्या नोंदणी शुल्कात भ्रष्टाचार

नागपूरच्या मनोरुग्णालयात रुग्णांच्या नोंदणी शुल्कात भ्रष्टाचार

ठळक मुद्देलिपिकाने हडपले ३० हजार : गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
नागपूर : रुग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणाऱ्या  स्थानिक मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे. राजकुमार पुंडलिक ठोमळे (वय ५७, रा. चंदनशेषनगर) असे आरोपी लिपिकाचे नाव असून, मानकापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मानकापूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील ओपीडीत ठोमळेची रुग्ण पंजीकरणासाठी नियुक्ती होती. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाची नोंदणी करण्यासाठी ४० रुपये शासकीय शुल्क आहे. मात्र, आरोपी ठोमळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून ८० रुपये घ्यायचा. त्याची पावती देण्यापूर्वी आरोपी कार्बन कॉपीवर ८० ऐवजी ४० रुपये नोंदवायचा. अशा प्रकारे त्याने रुग्णांचे नातेवाईक आणि प्रशासनासोबत तब्बल तीन वर्षे बनवाबनवी केली. त्याचप्रमाणे २६ डिसेंबर २०१४ ते १० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत २९,४७६ रुपयांची अफरातफर केली. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर वरिष्ठांनी ठोमळेला विचारणा केली असता तो असंबंद्ध माहिती देऊ लागला. तो गुन्ह्याची कबुली देत नसल्यामुळे डॉ. प्रवीण निलकंठ नवघरे यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून एएसआय एजाज शेख यांनी आरोपी ठोमळेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सामान्य रुग्ण बीपीएल गटात
आरोपी ठोमळे एकीकडे रुग्ण नोंदणीचे दुप्पट शुल्क उकळत असतानाच एक पावती दोन रुग्णांच्या कार्डवर लावत होता. दुसरे म्हणजे, दारिद्र्य रेषेखाली (बीपीएल) नसलेल्या रुग्णांचीही तो स्वत:च्या मनाने बीपीएल पेशंट म्हणून नोंदणी करीत होता, असेही प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

Web Title: Corruption in the registration fee of patients in Nagpur mental hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.