शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भ्रष्टाचारात पोलीस खाते नंबर १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:05 PM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (एसीबी) भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उद्देशाने दक्षता जागृती सप्ताहाचे आयोजन ३० आॅक्टोबरपासून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देएसीबीचा दक्षता जागरअभियानास प्रारंभ, विविध उपक्रमाचे आयोजन

आॅनलाईन लोकमतनागपूर : कायद्याचा धाक निर्माण करण्याची जबाबदारी असलेला पोलीस विभाग लाचखोरीत अव्वलस्थानी आहे. एसीबीच्या नागपूर परिक्षेत्रात सुरू असलेल्या वर्षात एकूण ८७ सापळे रचून ११३ लाचखोरांच्या मुसक्या बांधण्यात आल्या. पकडलेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक १७ आरोपी पोलीस खात्यातील आहे, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (एसीबी) भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उद्देशाने दक्षता जागृती सप्ताहाचे आयोजन ३० आॅक्टोबरपासून करण्यात येत आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान हे अभियान चालविले जाईल. त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहे.भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या हेतूने या अभियानाचे आयोजन असून, नागरिकांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी केले.ते म्हणाले, दक्षता सप्ताहात सर्वप्रथम एसीबीचे कर्मचारी-अधिकारी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतील. ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता घाट रोड येथील सरदार वल्लभभाई पटेल चौकातून स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.संविधान चौकात रॅलीचा समारोप होईल, दरम्यान, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करून भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका आणि वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात येतील.या अभियानांतर्गत नागरिकांसाठी व्यंगचित्र व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, घोषवाक्य २ नोव्हेंबरपर्यंत ७०४०२२२२२१ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठविता येणार आहे. या निमित्ताने नागरिकांनी भ्रष्टाचाºयांविरुद्ध तक्रारीसाठी निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवीन सुभेदार लेआऊटमधील शिवाजी सभागृहात आयोजित कार्यक्रमाने सप्ताहाचा समारोप होईल. यावेळी भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.११३ लाचखोर गजाआडएसीबीच्या नागपूर परिक्षेत्रात चालू वर्षात एकूण ८७ सापळ्यांचे आयोजन झाले. त्यात ११३ लाचखोर अडकले. त्यात वर्ग १ चे १२ अधिकारी, वर्ग २ चे १४, वर्ग ३ चे ६८ आणि वर्ग ४ चा एक कर्मचारी हाती लागला. ११३ लाचखोरात १२ खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. सापळ्यात अडकलेल्या विविध विभागाच्या शासकीय कर्मचाºयांमध्ये १७ आरोपी पोलीस खात्यातील आहेत. त्यात नागपूर शहरातील ४ आणि जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. त्या खालोखाल महसूल विभागाचे १४, पंचायत समितीचे ९, जिल्हा परिषदेचे ७ आणि वन विभागाच्या ६ कर्मचाºयांचाही समावेश आहे.कन्व्हिक्शन रेटचा चंद्रपूर पॅटर्नएकीकडे लाचखोर पकडण्याचे प्रमाण चांगले असले तरी दोषसिद्धतेची टक्केवारी (कन्व्हिक्शन रेट) कमी आहे. सर्वाधिक चांगला कन्व्हीक्शन रेट चंद्रपूर जिल्ह्याचा (९५ टक्के) आहे. त्यामुळे चंद्रपूर पॅटर्न राज्यभर राबविण्यावर विचारमंथन सुरू आहे. राज्यभर गाजलेल्या सिंचन घोटाळ्यात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे. त्यापैकी एका प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून दुसरे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणांमध्ये एकूण १२ अधिकारी संशयाच्या टप्प्यात असून, ३४ निविदांचीही चौकशी सुरू आहे, असेही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस