शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

निवृत्तीवेतनातून दिली शववाहिका : डॉ. कांबळे यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 7:20 PM

मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये शववाहिकेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकल, ट्रॉमा केअर सेंटर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांना शवविच्छेदन गृहापर्यंत नेण्याचा प्रवास स्ट्रेचरवरून व्हायचा. उन्ह, पाऊसात मृतदेह वाहून नेताना अडचणीचे व्हायचे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याबाबत खंत व्यक्त करीत शववाहिका दान करण्याचे आवाहनही केले होते. याची दखल मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी घेतली. त्यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.मेडिकलच्या रेडिओथेरपी विभागात आयोजित छोट्याखानी या लोकार्पण कार्यक्रमात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता डॉ. दीनकर कुंबलकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे, मेट्रन मालती डोंगरे व डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते. 

‘वात्सल्य बुद्धिस्ट हॉस्पिस’ या संस्थेतर्फे त्यांचे वडील मारोतीराव कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शववाहिका दान देत असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी दिली. सोबतच दानाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये बहुतांश रुग्ण गरीब, गावखेड्यातून व दुर्गम भागातून आलेले असतात. येथे त्यांच्यावर उपचारांची सोय होत असलीतरी त्यांना अनेक गोष्टींची मदतीची गरज असते. छोटीशीछोटी मदत त्यांना त्यांच्यावर आलेल्या संकटातून उभे राहण्याचे बळ देते. अशा रुग्णांसाठी काही दान दिल्यास समाजऋण फेडण्याची सर्वोत्तम संधी असते. याकरीताच मेडिकलमध्ये सामाजिक अधीक्षकांचा एक गट तयार करण्यात आला आहे. इच्छुकांनी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. मित्रा यांनी डॉ. कांबळे यांच्या कार्याचे कौतुक करीत केलेल्या दानाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन सामाजिक अधिक्षक श्याम पंजाला यांनी केले तर आभार किशोर धर्माळे यांनी मानले. लोकार्पण कार्यक्रमाला डॉ. कांबळे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdoctorडॉक्टर