जीर्ण शौचालय, मांस विक्री दुकानांवर मनपाचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:12 IST2021-08-28T04:12:16+5:302021-08-28T04:12:16+5:30

- प्रवर्तन विभागाची हनुमाननगर, धंतोली झोनमध्ये कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा प्रवर्तन विभागाच्या पथकाने शुक्रवारी जुनी शुक्रवारी ...

Corporation's hammer on dilapidated toilets, meat shops | जीर्ण शौचालय, मांस विक्री दुकानांवर मनपाचा हातोडा

जीर्ण शौचालय, मांस विक्री दुकानांवर मनपाचा हातोडा

- प्रवर्तन विभागाची हनुमाननगर, धंतोली झोनमध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रवर्तन विभागाच्या पथकाने शुक्रवारी जुनी शुक्रवारी परिसरातील जीर्ण शौचालय पाडले. हनुमाननगर झोनच्या अधिकाऱ्यांनी शौचालय मालक शुभम जयेश यांना मनपा अधिनियम २०१२ च्या कलम २६४ अंतर्गत नोटीस पाठविली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

प्रवर्तन विभागाने शुक्रवारी हनुमाननगर झोनअंतर्गत येणाऱ्या तुकडोजी पुतळा ते छोटा ताजबाग, सक्करदरा चौक ते जुनी शुक्रवारी, मानेवाडा चौक ते उदयनगर चौकापर्यंत २५ अतिक्रमणांचा सफाया केला. पथकाच्या दुसऱ्या टीमने धंतोली झोनअंतर्गत त्रिशरण चौक येथील फूटपाथवर उभारण्यात आलेल्या मांस विक्री दुकानांचे अवैध शेड तोडले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात संजय भाजीपाले व टीमने केली.

................

Web Title: Corporation's hammer on dilapidated toilets, meat shops