मनपा : नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव सभागृहाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:40 AM2021-01-05T00:40:18+5:302021-01-05T00:42:58+5:30

NMC Proposal for increase in map fee महापालिकेच्या नगर रचना विभागाने दिलेल्या नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीने सभागृहाकडे पाठविला आहे.

Corporation: Proposal for increase in map fee to the House | मनपा : नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव सभागृहाकडे

मनपा : नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव सभागृहाकडे

googlenewsNext
ठळक मुद्देनगर रचना विभागाची शुल्कवाढ : स्थायी समितीच्या बैठकीत एनडीएसच्या ९९ जवानांना मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या नगर रचना विभागाने दिलेल्या नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीने सभागृहाकडे पाठविला आहे. यावर अंतिम निर्णय सभागृहात घेतला जाईल. सध्या ३० ते १६० रुपये शुल्क भरून नकाशाची प्रत मिळते. नवीन प्रस्तावानुसार यासाठी ७०० ते ६,८०० रुपये द्यावे लागणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी न देता सत्तापक्ष व विरोधी सदस्यांनी सभागृहाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.

बैठकीत उपद्रव शोध पथकातील ९९ जवानांना ११ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. एकूण २०१ पदे मंजूर असून, यातील १८० कार्यरत होते. परंतु २१ नोव्हेंबरला यातील ९९ जवानांचा करार संपला. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नव्हती. सध्या पथकामार्फत मास्क कारवाई, अतिक्रमण, नायलॉन मांजाची कारवाई केली जात आहे.

अंबाझरी तलावाच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी ६ लाख ९२ हजार ८४३ रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यातील ३.१४ कोटी महामेट्रोकडून दिले जाणार आहे. उर्वरित १७.७१ कोटीची मागणी राज्य सरकारकडे केली जाईल. सध्या मनपा तीन कोटी देणार आहे. राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर हा निधी परत मिळेल.

... दिव्यांगांना व्यवसायासाठी अनुदान

केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ अंतर्गत मनपातर्फे व्यवसायासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. यासाठी मनपाने समिती गठित केली होती. ११८ प्रस्ताव आले होते. यातील १०० मंजूर करण्यात आले. प्रत्येक लाभार्थींला दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. मात्र जिल्हा परिषद वा अन्य विभागाकडून लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल.

१२ उद्यानांच्या नाल्यावर एसटीपी

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभागातर्फे १२ उद्यानालगतच्या नाल्यावर एसटीपी उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. यावर १.२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या पाण्याचा वापर उद्यानासाठी केला जाणार आहे. यात लक्ष्मीनगर झोनमधील पीएमजी सोसायटी उद्यान नरेंद्रनगर, कर्वेनगर उद्यान वर्धा रोड, धरमपेठ झोनमधील शंकरनगर उद्यान, जय विघ्नहर्ता काॅलनी उद्यान, धंतोली झोनमधील मोक्षधाम घाट उद्यान, नेहरूनगर झोनचे सेनापतीनगर उद्यान, गांधीबाग झोनचे चिटणवीसपुरा उद्यान, तुळसीबाग उद्यान, रतन काॅलनी उद्यान, सतरंजीपुरा झोनचे नाईक तालाब उद्यान तांडापेठ, लकडगंज झोनचे म्हाडा काॅलनी उद्यान, मंगळवारी झोनमधील सखाराम मेश्राम उद्यानाच्या बाजूला एसटीपी उभारला जाणार आहे.

Web Title: Corporation: Proposal for increase in map fee to the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.