शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आदिवासी अन् गरीब रुग्णांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 13:08 IST

Oxygen Bank: संकटाच्या काळात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य कार्यालय अधीक्षक खुशरु पोचा यांनी विदर्भातील मागास भागातील आदिवासी आणि शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन बँक सुरू केली आहे.

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. अशा संकटाच्या काळात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य कार्यालय अधीक्षक खुशरु पोचा यांनी विदर्भातील मागास भागातील आदिवासी आणि शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन बँक सुरू केली आहे. सध्या त्यांच्या ऑक्सिजन बँकेत ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध असून, त्याचा फायदा आदिवासी, गरीब रुग्णांना होत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे पाहून खुशरु पोचा यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सोशल मीडिया, धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात त्यांना यश आले. त्यांना अबूधाबी येथून पारसी नागरिकांनी विमानाने ४० तुर्की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले. तर एका १७ वर्षाच्या मुलाने आणि ३ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोचा यांच्याकडे २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचविले. यातील ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पांढरकवडा येथे, ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मेळघाटला पाठविले, तर नागपुरातील ४ गरीब रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आतापर्यंत पुरविले आहेत. शेतकरी नेता किशोर तिवारी यांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींना ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले आहेत, तसेच इतर शहरातील गरीब रुग्णांना ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवीत आहेत. गरीब रुग्ण ऑक्सिजन बँकेतून घेतलेले कॉन्सन्ट्रेटर वापरनंतर पुन्हा ऑक्सिजन बँकेत जमा करीत आहेत. आता चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा येथील आदिवासी भागात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी पाहता, आणखी ६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. खुशरु पोचा केवळ ऑक्सिजनचा पुरवठाच ते करीत नसून पहिल्या लॉकडाऊनपासून एक हजार स्वयंसेवकांद्वारे सेवा किचनच्या माध्यमातून त्यांनी ५० लाख रुपयांचे भोजनही वितरित केले आहे.  

रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक, मुख्यमंत्र्यांनी केला फोनलॉकडाऊनमध्ये गरजूंना भोजन पुरविण्याच्या तसेच गरीब आणि आदिवासी रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्याच्या खुशरु पोचा यांच्या महान कार्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कौतुक केले. रेल्वेमंत्र्यांनी ट्विट करून पोचा करीत असलेले कार्य इतरांना प्रेरणा देणारे असल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून ते करीत असलेल्या समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनnagpurनागपूर