शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

coronavirus: ‘ट्रेसिंग’चे गांभीर्य नाही, बाधित रुग्ण सैराट, आठ दिवसांत ५२,७९१ रुग्ण; ४९९ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:59 IST

coronavirus in Nagpur : ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

- सुमेध वाघमारेनागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. १९ ते २६ मार्च या सात दिवसांत तब्बल ५२,७९१ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४९९         रुग्णांचे जीव गेले. आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा व मृत्यूसंख्येचा हा उच्चांक आहे. धक्कादायक म्हणजे, सध्याच्या स्थितीत ६४ हजार ६४१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात गंभीर रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान  आहे. (no seriousness of ‘tracing’, infected patient Sairat, 52,791 patients in eight days; 499 deaths)ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

सोशल पोलीस नावालाच nगृह विलगीकरणातील ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या रामभरोसे आहेत. त्यापैकी बहुतेक जण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. nअशा बाधितांवर वॉच ठेवण्यासाठी सोशल पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, हे सोशल पोलिसिंग केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. दोन हजारांच्या दंडासह फौजदारी कारवाईचा इशाराही कमी पडत आहे. 

प्रशासनाची अहवालांबाबत उदासीनताजानेवारी-फेब्रुवारीत लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रम धडाक्यात झाले. मॉल्स, दुकाने, पर्यटन स्थळांवर गर्दी झाली. खासगी वाहनांतून लोकांचा प्रवास. ब्रिटनहून नागपूर-विदर्भात दाखल प्रवासी पॉझिटिव्ह येऊनही त्यांचा अहवाल देण्यास प्रशासनाने उदासीनता दाखवली.  

नागपूरनंतर बुलडाण्यात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ८०० ते ९०० नवे रुग्ण दिसून येत आहेत.  

वाशिम जिल्ह्यात ४०० ते ५००, अकोल्यात ३५० ते ४५०, यवतमाळ जिल्ह्यात ४५० ते ५५०, अमरावती जिल्ह्यात २५० ते ३५०,  वर्धा जिल्ह्यात २०० ते २५०, वर्धा व भंडारा जिल्ह्यात १५० ते २००, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ५० ते ८० रुग्णांची नोंद होत आहे. 

टाळेबंदी, संचारबंदीनंतरही कोरोनाचा स्फोट होण्याची ही आहेत कारणे... कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचे योग्य पद्धतीने होत नसलेले ‘ट्रेसिंग’. ‘सैराट’ होऊन शहरात अनिर्बंध वावरत असलेले ‘होम आयसोलेशन’चे रुग्ण.दुसरी लाट येण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासनाला आलेले अपयश.रस्त्यांवर, बाजारात गर्दी करणाऱ्या लोकांना मास्कचे गांभीर्य नसणे. सॅनिटायझरचा कमी झालेला वापर.सर्वात महत्त्वाचे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत बाळगलेली गुप्तता. 

ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंटकडे दुर्लक्ष शनिवार व रविवार स्वयंस्फूर्त बंदचे आवाहन केले गेले. मात्र, इतर दिवशी गर्दीने फुललेल्या बाजारपेठा व विविध कार्यक्रमांकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर कडक निर्बंध लावण्यात आले. पण, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट याला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर