coronavirus; खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांकडून कुठलीही सावधगिरी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:03 PM2020-03-17T12:03:07+5:302020-03-17T12:05:48+5:30

सर्वत्र भीतियुक्त वातावरण असताना खाद्यपदार्थ विक्रेते मात्र कुठलीही सावधगिरी न बाळगता खाद्यपदार्थाची विक्री करीत आहे. विशेष म्हणजे नागपूरकरही बिनधास्तपणे त्यावर ताव मारत असल्याचे शहरात चित्र आहे.

coronavirus; no precautions from hotel owners | coronavirus; खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांकडून कुठलीही सावधगिरी नाही!

coronavirus; खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांकडून कुठलीही सावधगिरी नाही!

Next
ठळक मुद्देनागपूरकरही बिनधास्त मारताहेत तावशहरात कोरोना अलर्ट

मंगेश व्यवहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. मॉल, थिएटर, सभागृह, मंगल कार्यालय या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. सर्वत्र भीतियुक्त वातावरण असताना खाद्यपदार्थ विक्रेते मात्र कुठलीही सावधगिरी न बाळगता खाद्यपदार्थाची विक्री करीत आहे. विशेष म्हणजे नागपूरकरही बिनधास्तपणे त्यावर ताव मारत असल्याचे शहरात चित्र आहे.
शहरातील रस्त्यावर मोठ्या संख्येने खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल लागलेले आहेत. या स्टॉलवर खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री होत आहे. खाद्यपदार्थ विक्री करताना विक्रेते कुठलीही खबरदारी बाळगताना दिसत नाहीत. आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता बाळगण्याचे, वारंवार हात धुण्याचे, बाहेर पडताना तोंड झाक ण्याचे आवाहन केले जात आहे. असे असतानाही खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या तोंडावर कुठलाही मास्क नाही. तासन्तास हात धुतले जात नाहीत. स्वच्छतेबाबतही गंभीरता नाही.
अशा अवस्थेत लोकही गर्दी करून पदार्थाचे उघड्यावर सेवन करीत आहेत. एवढेच नव्हे तर काही रेस्टॉरेंटमध्येही खाद्य पदार्थ विक्री करताना कुठलीही सावधगिरी बाळगताना दिसत नाहीत. रेस्टॉरेंटमधील वेटरला मास्क नाही, हात धुतले जातात की नाही याचीही खबरदारी घेतली जात नाही. यावर मालकांचाही अंकुश नाही.
आरोग्य विभागाकडून सातत्याने हा संसर्गजन्य आजार असल्याचे सांगण्यात येत आहे. सावधगिरी बाळगणे हा एकमेव पर्याय आहे. ज्यामुळे आजारावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. त्यामुळे विक्रेते असो की, खाणारे यांनी किमान या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
नामांकित हॉटेलमध्ये सावधगिरी
शहरातील नामांकित हॉटेलमध्ये कोरोनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगल्या जात आहे. हॉटेलच्या रिसेप्शनवर असणारे कर्मचारी तोंडाला मास्क लावून आढळले. शिवाय काऊंटरवरच सॅनिटायझरची बॉटलसुद्धा आढळून आली. काही नामांकित हॉटेलमध्ये कर्मचारी तोंडाला मास्क बांधून साहित्याची विक्री करीत होते.

Web Title: coronavirus; no precautions from hotel owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.