शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

CoronaVirus in Ngpur :नागपुरातील 'तो' रुग्ण पॉझिटिव्ह :  बाधितांची संख्या १७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 8:28 PM

नवी दिल्लीहून नागपुरात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या नमुन्याच्या अहवालावरून आज शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १७ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे‘एम्स’मध्ये नमुने तपासणीला सुरुवात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नवी दिल्लीहून नागपुरात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या नमुन्याच्या अहवालावरून आज शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे नागपूर ‘एम्स’ने आजपासून सुरू केलेल्या पहिल्याच तपासणीत हा रुग्ण पॉझिटिव्ह आला.  दुसरीकडे निजामुद्दीन तबलिगी मरकज हे कोरोना प्रसाराचे केंद्र बनले आहे. येथून सुमारे २००वर व्यक्ती नागपुरात आल्याचे सांगण्यात येते. १ एप्रिलपासून या सर्व संशयितांना आमदार निवास, वनामती व रविभवन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे, शुक्रवारी आणि शनिवारी मरकजहून आलेल्या ७५ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. परंतु दिल्लीहून आलेल्या ३२ वर्षीय युवकाचे नमुने पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली. हा १३ दिल्ली येथे गेला होता आणि दुसºयाच दिवशी म्हणजे १४ मार्चला रेल्वेने नागपुरात परत आला. त्याला १ एप्रिल रोजी वनामती येथे क्वारंटाईन करण्यात आले. नमुना पॉझिटिव्ह येताच रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या १८ दिवसात बाधित रुग्ण कुठे कुठे गेला याची माहिती घेतली जात आहे. संपर्कात आलेल्यांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले जाणार आहे. एम्स’ची प्रयोगशाळा रुग्णसेवेतमेयोतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र शुक्रवारी अचानक बंद पडल्याने प्रशासनासमोर संकट उभे ठाकले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तातडीने सूत्रे हलविली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनीही यात पुढाकार दाखविला. यामुळे रातोरात प्रयोगशाळा सुरू झाली. शनिवारी एम्सने पहिल्या टप्प्यात २८ नमुन्यांची तपासणी केली असता १ पॉझिटिव्ह तर २७ नमुने निगेटिव्ह आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर