शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:48 IST

लॉकडाऊनमध्ये काही टवाळखोर व बेजबाबदार लोक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:चा व त्यांच्या कुटुंबाचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा बेदरकार लोकांना झोन ३ चे डीसीपी राहुल माकणीकर यांनी भावनिक साद घातली आहे.

ठळक मुद्देडीसीपी माकणीकर यांची कवितेतून भावनिक साद : घराबाहेर न पडण्याचे आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून समजाविले जात आहे आणि बळाचाही वापर केला जात आहे. मात्र काही टवाळखोर व बेजबाबदार लोक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:चा व त्यांच्या कुटुंबाचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा बेदरकार लोकांना झोन ३ चे डीसीपी राहुल माकणीकर यांनी भावनिक साद घातली आहे. बाहेरची हवा जीवघेणी झाली आहे, कोरोना विषाणूचा संसर्ग असलेला कुठला कातिल तुमचा जीव घेईल हे सांगता येत नाही, असे सांगताना एका शायरने रचलेल्या, ‘बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है, युं ही कातिल से नजरे मिलाने की जरुरत क्या है...’ या ओळीतून ते लोकांना घरातच सुरक्षित राहण्याचे भावनिक आवाहन करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आणि नागपुरातही विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. अशावेळी प्रशासन आणि पोलीस वारंवार घरात राहण्याचा, स्वत:च्या व इतरांच्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत. कधी समजावून तर कधी सक्तीने लोकांना घरात राहण्यास सांगितले जात आहे. मात्र काहींची बेजबाबदार वृत्ती गेलेली दिसत नाही. संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची शिथिलता ठेवण्यात आली आहे. मात्र याचा फायदा घेऊन काही लोक काही काम नसताना बाहेर पडून लॉकडाऊनचे उल्लंघन करीत आहेत. अशांना पोलिसांकडून भावनिक साद घातली जात आहे. डीसीपी राहुल माकणीकर यांनी सोशल अकाउंटवरून सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेल्या कवितेतून घरी राहण्याचे भावनिक आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग कुणाला असेल ते सांगता येत नाही. अशावेळी घराबाहेर पडल्यानंतर आपण कुणाला भेटू आणि कुणाकडून त्याची लागण आपल्याला होईल, याची शाश्वती नाही. बाहेर असलेला कोरोना संसर्गित व्यक्ती तुम्हालाही त्या विषाणूची लागण करील आणि तुमचा व तुमच्या कुटुंबाचा जीव धोक्यात येईल. त्यामुळे ते ‘बेवजह कातिल से उलझने की जरुरत क्या है...’ असे समजावित आहेत. तुमचे मन घराबाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करीत असेल तरी तुमच्या पायांना थांबवा. हा काळ कठीण आहे आणि आपण घरात थांबल्यास तो लवकर जाईल, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. नागपूरकरांनो खबरदारी घ्या, पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन आम्हीही तुम्हाला करीत आहोत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस