CoronaVirus in Nagpur : आकडे वाढल्याने टेस्ट तर कमी केल्या नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:52 PM2020-09-28T22:52:26+5:302020-09-29T00:08:17+5:30

नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लागल्याचे चित्र दाखविण्यात येत आहे. संक्रमितांची संख्या प्रशासनाकडून कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी कोरोनाच्या जेवढ्या टेस्ट होत होत्या, त्यात घट झाली असून, ते ५० ते ६० टक्क्यावर आली आहे. प्रशासनाने आकडे वाढल्याचे पाहून टेस्ट कमी तर केल्या नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे असेल तर कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी हा प्रकार योग्य ठरणार नाही.

CoronaVirus in Nagpur: Tests reduced due to increase in numbers? | CoronaVirus in Nagpur : आकडे वाढल्याने टेस्ट तर कमी केल्या नाहीत?

CoronaVirus in Nagpur : आकडे वाढल्याने टेस्ट तर कमी केल्या नाहीत?

googlenewsNext
ठळक मुद्देटेस्टची संख्या घटली : पॉझिटिव्हही हजाराच्या आत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लागल्याचे चित्र दाखविण्यात येत आहे. संक्रमितांची संख्या प्रशासनाकडून कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी कोरोनाच्या जेवढ्या टेस्ट होत होत्या, त्यात घट झाली असून, ते ५० ते ६० टक्क्यावर आली आहे. प्रशासनाने आकडे वाढल्याचे पाहून टेस्ट कमी तर केल्या नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे असेल तर कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी हा प्रकार योग्य ठरणार नाही.
सोमवारी नागपूर जिल्ह्यात ९९४ पॉझिटिव्ह मिळाले. त्या तुलनेत टेस्टसुद्धा २७०१ झाल्या. यातून शहरात १,७६४ तर ग्रामीणमध्ये ९३७ टेस्ट झाल्या. सप्टेंबरच्या मध्यंतरात किमान ७ ते ८ हजार टेस्ट दररोज होत होत्या. त्यात आता घट झाली असून ३ ते ५ हजारापर्यंत आल्या आहेत. जाणकारांच्या मते टेस्ट वाढल्या तरच कोरोनावर अंकुश लावण्यात यश मिळेल. परंतु प्रशासनाने संक्रमण कमी दाखविण्यासाठी टेस्टच कमी केल्या आहेत.
सप्टेंबरच्या २८ दिवसातील आकड्यांकडे बघितल्यास यात ४६,२६० संक्रमित आढळले. दरम्यानच्या अवधीत १ लाख ८२ हजार ९२८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २५.२८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते की विकेंडदरम्यान टेस्ट कमी होतात.

९९४ नवीन पॉझिटिव्ह, ३८ मृत्यू
नागपूर जिल्ह्यात सोमवारी ९९४ नवीन पॉझिटिव्ह मिळाले. तर ३८ संक्रमितांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्हमध्ये शहरातील ७४३, ग्रामीणमध्ये २४७ व जिल्ह्याच्या बाहेरील ४ लोकांचा समावेश आहे. पॉझिटिव्हची एकूण संख्या ७५,८१५ व मृतांची संख्या २,४३८ झाली आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६०,२९१, ग्रामीण १५,१०७ व जिल्ह्याबाहेरील ४१७ आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये शहरातील १,७८१, ग्रामीण ४२२ व जिल्ह्याबाहेरील २३५ लोकांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८४५ नमुने तपासण्यात आले आहेत. सोमवारी खासगी लॅबमधून २८७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये २९७, एम्सच्या लॅबमधून ५३, मेडिकलच्या लॅबमधून ११०, मेयो येथून १८०, नीरी येथून ६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

१,४३१ कोरोनामुक्त
नागपूर जिल्ह्यात सोमवारी १,४३१ पॉझिटिव्ह कोरोनामुक्त झाले. यात शहरातील १,१५० व ग्रामीण भागातील २८१ लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५९,६९७ संक्रमित कोरोनामुक्त झाले आहेत. निरोगी होण्याचा दर ७८.७४ टक्के आहे.

Web Title: CoronaVirus in Nagpur: Tests reduced due to increase in numbers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.