CoronaVirus in Nagpur : रेकॉर्ड! नागपुरात तब्बल २२२ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:31 PM2020-07-24T22:31:14+5:302020-07-24T22:35:17+5:30

एकाच दिवसात कोरोनाचे २२२ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सर्वाधिक, १८३ रुग्ण याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळून आले होते. विशेष म्हणजे, तीन दिवसात रुग्णसंख्येने ५००चा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ३६८७ वर पोहचली आहे.

CoronaVirus in Nagpur: Record! As many as 222 patients tested positive in Nagpur | CoronaVirus in Nagpur : रेकॉर्ड! नागपुरात तब्बल २२२ रुग्ण पॉझिटिव्ह

CoronaVirus in Nagpur : रेकॉर्ड! नागपुरात तब्बल २२२ रुग्ण पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंतचा मोठा स्फोट : पाच रुग्णांचा मृत्यूग्रामीणमधील ७१ तर शहरामधील १५१ रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एकाच दिवसात कोरोनाचे २२२ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सर्वाधिक, १८३ रुग्ण याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळून आले होते. विशेष म्हणजे, तीन दिवसात रुग्णसंख्येने ५००चा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ३६८७ वर पोहचली आहे. शिवाय, पाच रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ७० झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीणमधील ७१ तर शहरामधील १५१ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ३० जूनपर्यंत २५ मृतांची नोंद होती. या महिन्यात गेल्या २४ दिवसात ४५ मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी मृत्यू झालेल्यांमध्ये मेयोमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. यातील एक ६२ वर्षीय पुरुष अचलपूर अमरावती येथील होता. या रुग्णाचा मृत्यू २३ जुलै रोजी पहाटे झाला. रुग्णाला फुफ्फुसाच्या आजारासोबतच उच्चरक्तदाब, टाईप टू मधुमेह आणि न्यूमोनिया झाला होता. दुसरा ३५ वर्षाचा अनोळखी पुरुष रुग्ण होता. जबर जखमी अवस्थेत या रुग्णाला २३ जुलै रोजी मेयोत आणले होते, उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मात्र, त्याचा नमुना तपासला असता तो पॉझिटिव्ह आला. ही धक्कादायक बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. झिंगाबाई टाकळी येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाला २१ जुलै रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे मृत्यू झाला. या रुग्णाला उच्चरक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, न्यूमोनिया आदी आजारही होते. उर्वरीत दोन मृत्यूची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून उपलब्ध झाली नाही. एकूण ७० रुग्णांच्या मृत्यूमध्ये ११ ग्रामीण, ४१ शहरातील, १८ जिल्ह्याबाहेरील आहेत.

रॅपिड अ‍ॅण्टीजन चाचणीत ४५ रुग्ण पॉझिटिव्ह
रॅपिड अ‍ॅण्टीजन चाचणीत ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय, मेयोच्या प्रयोगशाळेतून ३५, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून २५, एम्सच्या प्रयोगशाळेतून ४०, नीरीच्या प्रयोगशाळेतून १३, माफसूच्या प्रयोगशाळेतून २७, खासगी लॅबमधून ३७ असे मिळून २२२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज मेयो, मेडिकल, एम्स व सीसीसीमधून ९४ रुग्णांना सुटी देण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या २३०७ झाली आहे. १३१० रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, ही समाधानकारक बाब आहे.

या वसाहतीत आढळले रुग्ण
मनपाच्या आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मदिना अपार्टमेट ४, वाठोडा २, मानकापूर २,स्वीपर कॉलनी १, हिंगणा रोड २, चिखली १, राजीवनगर १, पाचपावली २, नंदनवन १४, भानखेडा २, बाभुळखेडा १, कळमना ४, सोमवारी क्वॉर्टर २, कुमारी कॉलनी १, दत्तात्रयनगर १, मानेवाडा १, साईनगर १, मेडिकल परिसर ४, भोईपुरा २, महाल २, टेलिफोननगर ४, बजेरिया १, मंगळवारी ५, देवतळे वाडा १, जांबभोळेनगर १, सेमिनरी हील्स २, माहुली १, गोळीबार चौक ३, नारा २, मोहनगर १, गोरेवाडा १, चंद्रनगर ९, गणेशपेठ २, लक्ष्मीनगर ४, अयप्पा मंदिर परिसर १, टेकानाका २, ताजबाग २, न्यू शुक्रवारी १, निर्मिती हाईट बिल्डिंग १, लकडगंज १, बारसेनगर १, इंदिरा गांधीनगर १, गोरेवाडा चौक १, डागा ले-आऊट १, भेंडे ले-आऊट २, धंतोली १, जयताळा १, गांधीनगर १, राणीदुर्गावतीनगर पंचशील नगर १, स्नेहनगर १, न्यू शुक्रवारी १, छापरुनर १, चिंचभवन २, यशोदानगर ३, पारडी १, मिनीमातानगर १, काचीपुरा २, दुबेनगर १, न्यू डायमंड नगर ५, रामबाग कॉलनी मेडिकल चौक १, विनोबा भावेनगर १, ब्लॉसम अपार्टमेंट १, सोमलवाडा १, रघुजीनगर ३, सुदामनगर १, रमणा मारुती १, बहादुरा फाटा १, यमुनानगर २, मरीयमनगर १, त्रिमूर्तीनगर १, टिमकी ३, अजनी १ अशा १३९ रुग्णांचा समावेश आहे.

कामठीत ३६ रुग्ण पॉझिटिव्ह
कामठी तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. आज ३६ रुग्णांची नोंद झाली. या शिवाय, कन्हान येथील सहा, काटोल येथील तीन, डोडमा (ता. कुही) येथील दोन तसेच खापरखेडा, सुराबर्डी (वाडी), परसोडी (ता. कळमेश्वर), खंडाळा (नरखेड), मौदा व नगरधन (ता. रामटेक) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दैनिक संशयित :२८३
बाधित रुग्ण : ३६८७
घरी सोडलेले : २३०७
उपचार घेत असलेले रुग्ण : १३१०
मृत्यू : ७०

Web Title: CoronaVirus in Nagpur: Record! As many as 222 patients tested positive in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.