शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

CoronaVirus : नागपूर पोलिसांचा ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करण्याचा प्रयत्न तूर्त अडखळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:44 IST

coronavirus : कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात काही भागात अद्यापही पाहिजे तसे जनजागरण झालेले नाही.

- नरेश डोंगरे

नागपूर : पे लोड केपेसिटी आणि सेंट्रल ऑफ ग्रेव्हीटीतील तृट्यांमुळे नागपूर पोलिसांना ड्रोनकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करण्याचा प्रयत्न तूर्त अडखळला आहे. कुशल तंत्रज्ञाकडून या त्रुटी दूर करण्यासाठी पोलीस अधिकारी कसोटीने प्रयत्न करीत आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात काही भागात अद्यापही पाहिजे तसे जनजागरण झालेले नाही. त्यामुळे अशा भागात ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी एका अत्याधुनिक ड्रोनची शुक्रवारी ट्रायल घेतली. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ड्रोन कार्यान्वित होऊ शकला नाही. त्यामुळे शनिवारी तंत्रज्ञांची मदत घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे ठरले होते.

त्यानुसार आज सकाळी पासून या ड्रोनला हाय क्वॉलिटीचे स्पीकर बांधून त्याची ट्रायल घेण्यात आली. मात्र, स्पीकरचे लोड अन ड्रोनची सेंट्रल ऑफ ग्रेव्हीटी मॅच न झाल्याने आजही ड्रोन कार्यान्वित होऊ शकला नाही. त्यामुळे रविवारी कुशल तंत्रज्ञांना बोलवून हा ड्रोन कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत. 

काय करणार ड्रोनकोरोनाचा धोका समजून सांगण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ते सर्व उपक्रम हाती घेतले आहे. पोलिसांची गस्ती वाहने प्रत्येक भागात सकाळपासून रात्रीपर्यंत फिरून जनजागरण करीत आहेत. काही भागात सामाजिक संस्था, संघटनाच्या आणि सेवाभावी नागरिकांच्या मदतीने ऑटोतून जनजागरण केले जात आहे. हजारावर कोविड योद्धेही सक्रिय आहेत. मात्र शहरात अनेक असे भाग आहे ज्या भागात दाटीवाटीने घरे उभी आहेत. अरुंद बोळीमुळे त्या भागात पोलिसांची वाहनेच काय साधे ऑटोही जात नाही. त्यामुळे अशा भागात जनजागरण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ड्रोन मोमीनपुरा, सतरंजीपुरा, भालदारपुरा आणि अशाच अन्य गर्दीच्या, दाटीवाटीच्या भागात फिरवला जाईल. या ड्रोनला जोडण्यात आलेल्या स्पीकरमधून कोरोनाच्या प्रादुर्भावाचे धोके नागरिकांना समजावून सांगन्यात येईल. त्यांना घरातच रहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आवाहन केले जाईल. 

रियल टाईम प्रोग्रामड्रोन कार्यान्वित करण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. निलेश भरणे आणि परिमंडळ पाच चे उपायुक्त निलोत्पल कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ड्रोन च्या रियल टाईम प्रोग्रामिंग वर भर दिला जात आहे. उदा. कुणी व्यक्ती, वाहनचालक ड्रोनला दिसताच त्यातून अमुक व्यक्तीने, तमुक वाहनचालक यांनी तातडीने घरात जावे, असे संदेश (अनाउन्स) हा ड्रोन देईल. या सबंधाने सर्व तयारी झाली असून, काही तृट्या शिल्लक आहेत, त्या रविवारी दूर केल्या जातील, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी लोकमत जवळ व्यक्त केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर