CoronaVirus in Nagpur : सलग दुसऱ्या दिवशी १०च्या आत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 23:30 IST2021-07-20T23:30:18+5:302021-07-20T23:30:51+5:30
CoronaVirus कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर पहिल्यांदाच सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १० च्या आत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

CoronaVirus in Nagpur : सलग दुसऱ्या दिवशी १०च्या आत रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर पहिल्यांदाच सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १० च्या आत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंगळवारी नागपूर जिल्ह्यात ८ रुग्ण आढळून आले असून एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,७७९ तर मृतांची संख्या १०,११५ वर स्थिरावली आहे.
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ६,५९७ तपासण्या झाल्या. त्या तुलनेत ०.१२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात ४,९७२ तपासणीतून ७ तर, ग्रामीणमध्ये १,६२३ तपासणीतून केवळ १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,३९,९१७ तर मृतांची संख्या ५,८९१ झाली आहे. ग्रामीणमध्ये रुग्णांची एकूण संख्या १,४६,०६२ झाली असून मृतांची संख्या २,६०३ स्थिरावली आहे. आज २५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले. आतापर्यंत ४,८२,३७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली हा दर ९७.८९ टक्के आहे. सध्या जिल्ह्यात २८७ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. यातील २१२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ७५ रुग्ण विविध शासकीयसह खासगी हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.
कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ६५९५
शहर : ७ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९२,७७९
ए. सक्रिय रुग्ण : २८७
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,३७७
ए. मृत्यू : १०११५