शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना बाधितांची संख्या ११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 9:05 PM

दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची १६ वर्षीय मुलगी तर बाधित रुग्णाच्या दुकानात काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या ११वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे१६ वर्षाच्या मुलीसह ४० वर्षाच्या व्यक्तीला लागण- ६६ संशयित रुग्ण दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची १६ वर्षीय मुलगी तर बाधित रुग्णाच्या दुकानात काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या ११वर पोहचली आहे. आज दिवसभरात ६६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ सुरू असतानाही अनेक नागरिक विशेषत: तरुण वर्ग रस्त्यावर दिसून येत आहे. वसाहतीमध्ये व गल्लीबोळात दुपारी व सायंकाळी गप्पा रंगत आहेत. हे धोकादायक ठरणारे आहे. यातून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घराबाहेर पडूच नका, असा वारंवार सल्ला डॉक्टर देत आहेत. शनिवारी आलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांमधून एक ४०वर्षीय व्यक्ती गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या दुकानात काम करीत होता. शुक्रवारी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता आज त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले. १६ वर्षाची दुसरी रुग्ण बाधित रुग्णाकडे व्यवस्थापकाचे काम करणाºयाची मुलगी आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाची ही रुग्ण आहे. या दोघांना मेयोच्या वॉर्ड क्र २४ मध्ये दाखल केले आहे.३७५ नमुने निगेटिव्हमेयोच्या प्रयोगशाळेला आज दिवसभरात ६२ नमुने प्राप्त झाले. यातील बहुसंख्य नमुने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे व त्यांच्या वसाहतीतील नागरिकांचे आहेत. आतापर्यंत ३८६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ३७५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. केवळ ११ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.मेयोत संशयितांचा वॉर्ड फुल्लबाधित रुग्णांची संख्या वाढताच संशयित रुग्णांची संख्याही वाढली आहे. यात सर्वाधिक भार मेयोवर पडला आहे. मेयोने बाधित रुग्णांसाठी २० खाटांचा वॉर्ड क्र. २४, संशयित रुग्णांसाठी २०-२० खाटांचे वॉर्ड क्र. ४ व ६ उपलब्ध करून दिला आहे. आज दिवसभरात मेयोच्या दोन्ही संशयितांच्या वॉर्डमध्ये ३७ रुग्ण दाखल झाले आहे. यामुळे दोन्ही वॉर्ड फुल्ल आहेत. तर मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये २९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. या सर्वांच्या नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.

मेयोत ५१ संशयित रुग्ण

बाधित रुग्णांची संख्या वाढताच संशयित रुग्णांची संख्याही वाढली आहे. यात सर्वाधिक भार मेयोवर पडला आहे. एकट्या मेयोमध्ये आज तब्बल ५१ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. रुग्ण वाढताच मेयो प्रशासनाने आणखी एक वॉर्ड उपलब्ध करून दिला आहे. आता बाधित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. २४, संशयित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. ४, ५ व ६ उपलब्ध करून दिला आहे.मेडिकलमध्ये ३२ संशयितमध्ये सहा डॉक्टरमेडिकलमध्ये ३२ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यात १८ पुरुष तर १४ महिला आहेत. विशेष म्हणजे बाधित रुग्णांच्या वसाहतीमधीलच २० संशयित रुग्ण आहेत. शिवाय, सहा निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. वॉर्ड क्र. २५ मध्ये या सर्व संशयितांना दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर