शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

CoronaVirus in Nagpur : मरकजहून आलेले ५४ जण नागपुरात 'क्वारंटाईन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 8:48 PM

दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मकरजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये नागपुरातील सुमारे ७० जणांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी ५४ जणांचा शोध लागला असून, त्यांना आमदार निवास येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मकरजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये नागपुरातील सुमारे ७० जणांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी ५४ जणांचा शोध लागला असून, त्यांना आमदार निवास येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.नागपुरातून दरवर्षी तबलिग जमात मकरजमध्ये सहभागी होण्यासाठी लोक जातात. ‘कोरोना’चे सावट असतानादेखील ते यंदा गेले होते. १८ ते २० मार्चदरम्यान शहरातील ७० हून अधिक लोक तेथे होते. त्यातील नेमके किती परतले, याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. या सर्वांना शोधून तातडीने ‘क्वारंटाईन’ करण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी मंगळवारी रात्री दिले. त्यानंतर मनपा प्रशासन व पोलिसांनी रात्रभरात ५४ जणांची यादी करून त्यांच्याशी संपर्क केला. त्या सर्वांना आमदार निवास येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आले. सर्वांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, या मरकजमध्ये सहभागी झालेल्यांनी स्वत:हून मनपा प्रशासनाशी संपर्क साधावा व स्वत:ची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLA Hostelआमदार निवासnagpurनागपूर