CoronaVirus in Nagpur : मरकजहून आलेले ५४ जण नागपुरात 'क्वारंटाईन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:56 IST2020-04-01T20:48:37+5:302020-04-01T20:56:25+5:30
दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मकरजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये नागपुरातील सुमारे ७० जणांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी ५४ जणांचा शोध लागला असून, त्यांना आमदार निवास येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.

CoronaVirus in Nagpur : मरकजहून आलेले ५४ जण नागपुरात 'क्वारंटाईन'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मकरजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये नागपुरातील सुमारे ७० जणांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी ५४ जणांचा शोध लागला असून, त्यांना आमदार निवास येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागपुरातून दरवर्षी तबलिग जमात मकरजमध्ये सहभागी होण्यासाठी लोक जातात. ‘कोरोना’चे सावट असतानादेखील ते यंदा गेले होते. १८ ते २० मार्चदरम्यान शहरातील ७० हून अधिक लोक तेथे होते. त्यातील नेमके किती परतले, याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. या सर्वांना शोधून तातडीने ‘क्वारंटाईन’ करण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी मंगळवारी रात्री दिले. त्यानंतर मनपा प्रशासन व पोलिसांनी रात्रभरात ५४ जणांची यादी करून त्यांच्याशी संपर्क केला. त्या सर्वांना आमदार निवास येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आले. सर्वांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, या मरकजमध्ये सहभागी झालेल्यांनी स्वत:हून मनपा प्रशासनाशी संपर्क साधावा व स्वत:ची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.