CoronaVirus in Nagpur : सात नवे बाधित, शून्य मृत्यूसंख्येचा सलग पाचवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 09:09 PM2021-07-21T21:09:23+5:302021-07-21T21:09:51+5:30

CoronaVirus कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता एकदम खालच्या पातळीला पोहोचला आहे. संसर्गाचा दर सातत्याने खाली येत असून नवीन बाधितांची संख्यादेखील कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ७ नवे बाधित आढळले.

CoronaVirus in Nagpur: The fifth consecutive day of seven newly infected, zero deaths | CoronaVirus in Nagpur : सात नवे बाधित, शून्य मृत्यूसंख्येचा सलग पाचवा दिवस

CoronaVirus in Nagpur : सात नवे बाधित, शून्य मृत्यूसंख्येचा सलग पाचवा दिवस

Next
ठळक मुद्दे१५ बाधित झाले ठीक : रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.८९ वर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता एकदम खालच्या पातळीला पोहोचला आहे. संसर्गाचा दर सातत्याने खाली येत असून नवीन बाधितांची संख्यादेखील कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ७ नवे बाधित आढळले. सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात एकही मृत्यू नोंदविण्यात आला नाही. सलग तिसऱ्या दिवशी दहाहून कमी नवे बाधित आढळले.

बुधवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ६ हजार ९०१ नमुन्यांची चाचणी झाली. त्यातील केवळ ०.१० टक्के लोक बाधित आढळले. शहरातील चार, ग्रामीणमधील दोन व जिल्ह्यातील एका बाधिताचा यात समावेश आहे. आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ४ लाख ९२ हजार ७८६ इतकी झाली असून मृत्यूची संख्या १० हजार ११५ इतकी आहे. बुधवारी १५ रुग्ण ठीक झाले. रिकव्हरीचा दर ९७.८९ टक्क्यांवह पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ८२ हजार ३९२ बाधित ठीक झाले.

२०५ बाधित होम आयसोलेशनमध्ये

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २७९ इतकी आहे. यात शहरातील २१८, ग्रामीणमधील ५४ व जिल्ह्याबाहेरी सात जणांचा समावेश आहे. सक्रिय रुग्णांतील २०५ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर ७४ जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. सर्वाधिक २१ रुग्ण मेडिकलमध्ये दाखल आहेत. मेयोत सहा, एम्समध्ये सात जणांवर उपचार सुरू आहे. उर्वरित रुग्ण खाजगी इस्पितळांत आहेत.

कोरोनाची बुधवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ६,९०१

शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ३ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९२,७८६

ए. सक्रिय रुग्ण : २७९

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,३९२

ए. मृत्यू : १०,११५

Web Title: CoronaVirus in Nagpur: The fifth consecutive day of seven newly infected, zero deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.