CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 22:49 IST2020-12-18T22:48:29+5:302020-12-18T22:49:20+5:30
Corona Virus, nagpur news दिवाळीपूर्वी दैनंदिन रुग्णसंख्येत कमी झालेली कोरोनाबाधितांची वाढ डिसेंबरमध्ये वाढताना दिसून येत आहे. या महिन्याच्या पहिल्या ५ दिवसात दोनदा रुग्णसंख्या ५०० वर गेली. आता मागील ४ दिवसांपासून ४०० वर रुग्णांची भर पडत आहेत.

CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीपूर्वी दैनंदिन रुग्णसंख्येत कमी झालेली कोरोनाबाधितांची वाढ डिसेंबरमध्ये वाढताना दिसून येत आहे. या महिन्याच्या पहिल्या ५ दिवसात दोनदा रुग्णसंख्या ५०० वर गेली. आता मागील ४ दिवसांपासून ४०० वर रुग्णांची भर पडत आहेत. शुक्रवारी ४४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. ७ रुग्णांचे बळी गेले. बाधितांची एकूण संख्या ११९२२१ झाली असून मृतांची संख्या ३८३२ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस येण्यास आणखी दोन महिन्याचा कालावधी आहे. मात्र थंडी वाढताच बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. सध्या संसर्गाचा वेग कमी असला तरी शहरात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाल्याने प्रादुर्भावाची शक्यता वाढली आहे. यामुळे मास्कचा वापर, फिजिकल डिस्टंन्सिंग व वारंवार हात धुणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज ५१४३ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ४३६५ आरटीपीसीआर तर ७७८ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. नव्या रुग्णांच्या तुलनेत कमी, ३५८ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९१.७७ टक्क्यांवर गेले आहे.
शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी २, जिल्हाबाहेरील ३ मृत्यू
नागपूर जिल्ह्यात मागील ७ दिवसापासून मृत्यूची संख्या १०वर गेली नाही. आज मृत्यूमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील २, जिल्हाबाहेरील ३ आहेत. शहरात आतापर्यंत २६०५, ग्रामीणमध्ये ६६५ तर जिल्हाबाहेरील रुग्णांचे ५६२ मृत्यू झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३६४, ग्रामीणमधील ७७ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण आहेत. ५९८३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १४०४ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत.
दैनिक संशयित : ५१४३
बाधित रुग्ण : ११९२२१
बरे झालेले : १०९४०६
उपचार घेत असलेले रुग्ण : ५९८३
मृत्यू : ३८३२