शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 22:12 IST

सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्येचा उच्चांक : १,०७१ पॉझिटिव्ह५२ बळीदिलासादायक, १०३६ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या २२,२२५ तर मृतांची संख्या ८१४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, हजारावर रुग्ण बाधित आढळून आले असले तरी १०३६ रुग्ण बरे झाले आहेत.नागपूर जिल्ह्यात कालपर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद दोन दिवसांपूर्वी, रविवारी झाली. ४६ मृत्यू झाले होते. परंतु आज मृत्यूसंख्येने नवा विक्रम गाठला. वाढत्या मृत्यू व रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आज मेयोमध्ये १७ तर मेडिकलमध्ये १२ रुग्णांचे मृत्यू झाले. यात भंडारा येथील ५९ वर्षीय पुरुष, कामठी रोड येथील ५३ वर्षीय महिला, सुगत नगर येथील ७३ वर्षीय पुरुष, आदिवासी ले-आऊट वडधामना येथील ६८ वर्षीय पुरुष, झिंगाबाई टाकळी येथील ४७ वर्षीय पुरुष, नवीन खलासी लाईन कामठी येथील ६४ वर्षीय महिला, पटवर्धन अपार्टमेंट सीताबर्डी येथील ४७ वर्षीय पुरुष, सावित्री बाई फुले स्लम वसाहत पार्वतीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, बहादुरा दिघोरी येथील एक रुग्ण, धंतोली येथील ९५ वर्षीय महिला, सावनेर येथील ६३ वर्षीय महिला व ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध झाली नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये ४६ शहरातील, चार ग्रामीण भागातील तर दोन जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरात ६१३, ग्रामीणमध्ये ११५ तर जिल्हाबाहेर ८६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.अर्धे रुग्ण खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्हआज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अर्धे रुग्ण खासगी लॅबमधील आहेत. ४५३ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. अ‍ॅन्टिजेन चाचणीत २११ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले, तर आरटीपीसीआर चाचणीत एम्समध्ये १३१, मेडिकलमध्ये ५९, मेयोमध्ये १५९, नीरीमध्ये ५८ अशा एकूण १,०७१ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, १७६१ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली.बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८ टक्क्यांवरदिलासादायक म्हणजे, मागील आठवड्यात कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांवर गेले असताना आज ते ५८.७९ टक्क्यांवर पोहचले आहे. १,०३६ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या १३,०६८ वर पोहचली आहे. यात शहरातील ९,२०६ तर ग्रामीण भागातील ३,८६२ रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत ८,३४३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात शहरातील ६,६४२ तर ग्रामीणमधील १७०१ रुग्ण आहेत.दैनिक संशयित : ५,७६४बाधित रुग्ण : २२,२२५बरे झालेले : १३,०६८उपचार घेत असलेले रुग्ण : ८,३४३मृत्यू : ८१४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू