CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा भयंकर स्फोट, रुग्ण-मृत्यूसंख्येचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 08:54 PM2021-04-08T20:54:04+5:302021-04-08T20:56:54+5:30

Corona outbreak कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप दिसून येऊ लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारावर रुग्णांची भर पडली. गुरुवारी ५,५१४ रुग्ण व ७३ मृत्यूची नोंद झाली.

CoronaVirus in Nagpur: Corona outbreak, high patient-death toll | CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा भयंकर स्फोट, रुग्ण-मृत्यूसंख्येचा उच्चांक

CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा भयंकर स्फोट, रुग्ण-मृत्यूसंख्येचा उच्चांक

Next
ठळक मुद्दे५,५१४ पॉझिटिव्ह, ७३ मृत्यू : ग्रामीणने रुग्णसंख्येत शहराची साधली बरोबरी

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप दिसून येऊ लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारावर रुग्णांची भर पडली. गुरुवारी ५,५१४ रुग्ण व ७३ मृत्यूची नोंद झाली. रुग्ण व मृत्यूसंख्येच्या या उच्चांकाने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या संसर्गात ग्रामीणने शहराची बरोबरी साधली. शहरात २,८८१ रुग्ण तर ग्रामीणमध्ये २,६२८ रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या २,५९,७३५ झाली असून, मृतांची संख्या ५,५७७ वर पोहचली आहे.

नागपूर जिल्ह्यात दुसरी लाट अधिक तीव्र होऊ लागली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात बेड कमी पडू लागले आहेत. यात रेमडेसिवीरसारख्या आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा पडल्याने रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी १९,१७६ चाचण्या झाल्या. यात १३,८१२ आरटीपीसीआर तर ५,३६४ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ५,३२८ तर अँटिजेनमधून १८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३,२७७ बाधित रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २,०९,०६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात कोरोना बरे होण्याचा दर ९४ टक्के होता. आता तो ८०.९० टक्क्यांवर आला आहे.

शहरात बाधितांची संख्या दोन लाखाजवळ

शहरात मंगळवारी ४० रुग्णांचे तर ग्रामीणमध्ये २८ रुग्णांचे जीव गेले. मागील आठवड्यापर्यंत शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये दैनंदिन मृत्यूचे प्रमाण २० ते ३० टक्के असायचे, आता ५० टक्क्यांवर गेल्याने चिंता वाढली आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखाजवळ पोहचली. आतापर्यंत १,९९,६१४ रुग्ण तर, ग्रामीणमध्ये ५९,०४६ रुग्ण आढळून आले.

मेडिकलमध्ये बेड ७६०, रुग्ण ७४६

मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांसाठी ७६० खाटा असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत ७४६ रुग्ण भरती होते. उर्वरित खाटांवर कोरोना संशयित व सारीचे रुग्ण असल्याने संपूर्ण खाटा फुल्ल झाल्या होत्या. मेयोत ६०० खाटांच्या तुलनेत ५३५ कोरोनाचे रुग्ण भरती होते. एम्समध्ये खाटांची संख्या वाढवून ८० करण्यात आली. सध्या ८९ रुग्ण उपचार घेत आहेत. मनपा रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयातील स्थितीही जवळपास अशीच आहे. शहरात तातडीने ५०० ऑक्सिजन बेडची तातडीने सोय करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १९,१७६

एकूण बाधित रुग्ण :२,५९,७३५

सक्रिय रुग्ण : ४५,०९७

बरे झालेले रुग्ण :२,०९,०६१

एकूण मृत्यू : ५,५७७

Web Title: CoronaVirus in Nagpur: Corona outbreak, high patient-death toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.