Coronavirus in Nagpur: 467 new positive, 7 deaths | CoronaVirus in Nagpur : ४६७ नवीन पॉझिटिव्ह, ७ जणांचा मृत्यू

CoronaVirus in Nagpur : ४६७ नवीन पॉझिटिव्ह, ७ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. बुधवारी ४६७ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ७ जणांचा मृत्यू झाला, तसेच ३५८ जण बरे झाले. आतापर्यंत एकूण १,२०,५४८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या १.२९,२२५ झाली आहे, तर मृतांची एकूण संख्या ४०४२ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरातील ४०३, ग्रामीणचे ६० आणि जिल्ह्याबाहेरचे ४ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील १ व जिल्ह्याबाहेरचे ४ जण आहेत. बुधवारी ४७८८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ४०५९, ग्रामीणमधील ७२९ जणांचा समावेश आहे.

ॲक्टिव्ह - ४६३५

बरे झालेले १.२०,५४८

मृत्यू - ४०४२

Web Title: Coronavirus in Nagpur: 467 new positive, 7 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.