शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Nagpur; स्मशान घाटावर राबताहेत दिवस-रात्र २०० कोरोना योद्धे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 07:45 IST

Nagpur News आरोग्य सेवेतील कर्मचारी कोरोना योद्धा आहेतच. पण स्मशान घाटावर दिवस-रात्र राबणारे सफाई कर्मचारी खरे कोरोना योद्धा आहेत.

ठळक मुद्देदररोज ३०० ते ४०० अंत्यसंस्कारजीव धोक्यात घालून वर्षभरापासून सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. शहरातील मृतांचा आकडा पाच हजाराच्या वर गेला आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर टीका होत असली तरी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह आणण्यापासून तर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडण्याची कौतुकास्पद कामगिरी मनपाचे सफार्ई कर्मचारी पार पाडत आहेत. यात झोनस्तरावरील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. यासाठी तब्बल २०० कर्मचारी दिवस-रात्र राबताहेत. यातील ७० ते ८० सफाई कर्मचारी वर्षभरापासून हे सेवाकार्य करीत आहेत. आरोग्य सेवेतील कर्मचारी कोरोना योद्धा आहेतच. पण स्मशान घाटावर दिवस-रात्र राबणारे सफाई कर्मचारी खरे कोरोना योद्धा आहेत.

एप्रिल महिन्यात शहरातील दहनघाट व कब्रस्तानावर दररोज ३०० ते ४०० अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी घाटावर प्रतीक्षा करावी लागत होती. सकाळपासून तर रात्री १० ते ११ वाजेपर्यंत मनपाचे कर्मचारी अंत्यसंस्कार करीत होते. अजूनही परिस्थिती गंभीर आहे. मृतांचा आकडा काहीसा कमी झाला तरी घाटावरील गर्दी कायम आहे.

कोरोबा बाधितांचा मृत्यू झाल्यास संक्रमणाच्या भीतीमुळे रक्तातील नात्यातील लोक अंत्यसंस्कार करण्याचे टाळतात. पण आपला जीव धोक्यात घालून मनपाचे कर्मचारी ही जबाबदारी पार पाडत आहे. यासाठी ३० शववाहिका कार्यरत आहेत. झोनस्तरावरून याचे नियंत्रण केले जाते. बाधिताचा मृत्यू झाल्यास कोरोना वॉर रूमला याची माहिती मिळताच शववाहिका पाठविली जाते. रुग्णालय अथवा घरून मृतदेह घाटावर नेल्यानंतर अंत्यसंस्कारही पथकातील कर्मचाऱ्यांनाच करावे लागतात.

वर्षभरात जिल्ह्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू - ८,१९३

कोरोनामुळे शहरात झालेले मृत्यू - ४,९५२

कोरोनामुळे ग्रामीणमध्ये झालेले मृत्यू - २,०६६

कोरोनामुळे जिल्ह्याबाहेरील मृत्यू - १,१७५

एका अंत्यसंस्काराला लागतात दोन तास

अंत्यसंस्कारासाठी १५ पथक गठित करण्यात आले आहेत. मृतदेह रुग्णालयातून घाटावर आणणे, त्यावर अंत्यसंस्कार करणे, या प्रक्रियेसाठी पथकाला दीड ते दोन तास लागतात. अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच दुसरा कॉल येतो. हा क्रम दिवसभर सुरू असतो. पीपीई किट घालून आठ ते दहा तास काम करावे लागत आहे.

बेवारस मृतदेहाचे हेच वारस

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यात अनेक बेवारस मृतांचा समावेश असतो. अशा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनाच करावे लागतात. बेवारस मृतदेहाचे आपणच वारस म्हणून पथकातील कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कार करावे लागतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस