शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरातील १३६२ रुग्ण कोरोनामुक्त : बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:18 IST

जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक राहिली. मंगळवारी १६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १२७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक राहिली. मंगळवारी १६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १२७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के झाले. देशामध्ये हे प्रमाण ८०.८६ टक्के आहे. नागपूरचे प्रमाण २.३२ टक्के अधिक असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एवढेच नाही तर नागपूरमधील हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण आहे. जूनमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यापर्यंत पोहचले होते.कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये १३६२ रुग्ण शहरातील तर, ३०० रुग्ण ग्रामीणमधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात शहरातील ४५ हजार ३७७ तर, ग्रामीणमधील ९८३५ रुग्णांचा समावेश आहे. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात सध्या ९०१८ (शहर-५७८२, ग्रामीण-३२३६) कोरोना रुग्ण आहेत. त्यात ३७९८ गृह विलगीकरणातील रुग्ण आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ९२५, ग्रामीणमधील ३४० तर, इतर भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६६ हजार ३८० कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी ५३२७ (शहर-३४४५, ग्रामीण-१८८२) नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत एकूण ४ लाख ७ हजार ८६ नमुने तपासण्यात आले.५४ रुग्णांचा मृत्यूमंगळवारी कोरोनामुळे ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील ४१, ग्रामीणमधील ५ तर, इतर ठिकाणच्या ८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २१५० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन मृत्यूसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ११०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.खासगी प्रयोगशाळेत ३५६ पॉझिटिव्हखासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या ९१४ मधून ३५६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. अ‍ॅन्टीजेन चाचणीत ३८२० मधील २६५ नमुने पॉझिटिव्ह मिळाले. तसेच, एम्समध्ये १२८, मेडिकलमध्ये १९६, मेयोमध्ये १८३, माफसूमध्ये १०१ तर, नीरीमध्ये ४४ नमुने पॉझिटिव्ह मिळून आले.

अ‍ॅक्टिव - ९०१८स्वस्थ - ५५२१२मृत्यू - २१५०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर