शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली नागपूरमधील परिस्थितीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 23:04 IST

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काय स्थिती आहे, ते बघण्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी विविध ठिकाणची पाहणी केली.

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गुरुवारी शहरातील काही भागात फिरून परिस्थितीचा धावता आढावा घेतला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काय स्थिती आहे, ते बघण्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. त्यांच्या सोबत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि इतर वरिष्ठ अधिकारी होते.

ते सायंकाळी ५.१५ च्या सुमारास मेयो हॉस्पिटल चौकात  पोहोचले.  तेथे त्यांनी  परिसराची पाहणी केली  यावेळी  एक ऑटो आणि त्यामध्ये काही लोक  जाताना त्यांना दिसले. ही मंडळी कोरोनाच्या संदर्भाने  जनजागृती करीत होती.  त्यांच्याशी गृहमंत्र्यांनी संवाद साधला.  पोलिसांनी आम्हाला या भागात कोविड योद्धा म्हणून नियुक्त केले  असून  त्यामुळे आम्ही  सामाजिक कार्य म्हणून दिवसभर जनजागरण करतो.  नागरिकांना  कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका समजावून सांगतो  आणि त्यांनी घराबाहेर निघू नये म्हणून  सूचना देतो, असे या कोविड योद्ध्यांनी गृहमंत्र्यांना सांगितले.  यानंतर गृहमंत्र्याच्या ताफा सतरंजीपुरा तसेच मोमीनपुरा भागात पोहोचला. येथील तसेच अन्य ठिकाणच्या नाकेबंदीची गृहमंत्र्यांनी पाहणी केली.पोलिसांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी तेसुद्धा पोलिस आयुक्तंकडूनजाणून घेतले. त्यानंतर या भागातील कायदा व सुव्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त, राहुल माकणीकर यांनी त्यांना परिमंडळ तीन मधील स्थितीची माहिती दिली. गृहमंत्री आणि पोलिस आयुक्त नंतर मानेवाडा भागात पोहचले. या भागातील  त्यांनी पाहणी करून परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूरAnil Deshmukhअनिल देशमुख