शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : देशमुखांनी ‘गृह’मंत्र्यांना दिला आराम, ‘जनता कर्फ्यू’चा आढावा घेत बनवला स्वयंपाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 22:43 IST

सकाळापासूनच अनिल देशमुख हे निवासस्थानाहून राज्यातील ‘अपडेट्स’घेत होते व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत होते. यादरम्यान त्यांना थोडी सवड मिळाली

नागपूर : ‘कोरोना’विरोधात लढा देत असताना पुकारण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला जनतेसोबतच लोकप्रतिनिधींनीदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील ‘मास्टरशेफ’चे कुटुंबीयांना बºयाच कालावधीनंतर दर्शन झाले. दिवसभर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेत असताना देशमुख यांनी काही निवांत क्षण काढले व चक्क घरच्या स्वयंपाकघराची सूत्रे घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे ‘जनता कर्फ्यू’त राज्याचे गृहमंत्री म्हणून ते व्यस्त असताना घरातील गृहमंत्र्यांना मात्र त्यांनी आराम दिला.

सकाळापासूनच अनिल देशमुख हे निवासस्थानाहून राज्यातील ‘अपडेट्स’घेत होते व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत होते. यादरम्यान त्यांना थोडी सवड मिळाली अन् लगेच त्यांनी आपला मोर्चा स्वयंपाकघराकडे वळविला. आवश्यक ते सर्व मसाले टाकून त्यांनी फुलकोबीची भाजी बनविली व काही वेळातच चवदार भाजीसह स्वयंपाक तयार केला. त्यांच्या पाककलेने त्यांच्या पत्नी आरती तसेच मुलगी डॉ.पायल व सून राहत यादेखील प्रभावित झाल्या. यापुढे १५ दिवस तुम्हीच स्वयंपाक करा, असे म्हणत आरती देशमुख यांनी गृहमंत्र्यांना प्रशस्तीपत्रदेखील दिले. कुटुंबियातील प्रत्येकाने त्यांच्या पाककलेची प्रशंसा केली व प्रत्येक सदस्य गप्पांमध्ये रंगला. विशेष म्हणजे यानंतर लागलीच देशमुख यांनी परत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

खासगी डॉक्टरांनीदेखील पुढाकार घ्यावा‘कोरोना’शी लढण्यासाठी प्रशासनाप्रमाणेच समाजानेदेखील पुढाकार घेतला आहे. सरकारी दवाखान्यांतील डॉक्टर्स अहोरात्र काम करतच आहेत. खाजगी दवाखाने व डॉक्टरांनीदेखील पुढाकार घेऊन सरकारी यंत्रणांना मदत करावी, असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले.  यासंदर्भात खाजगी डॉक्टर्सनी स्वत:हून स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना संपर्क करावा व स्वत:चे योगदान द्यावे. यामुळे ‘कोरोना’चा सामना आणखी सक्षमपणे करता येईल, असेही ते म्हणाले. पुढील काही दिवस परीक्षेचे असून निश्चयाने ‘कोरोना’ला हरविले जाऊ शकते. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे व घरी बसून शासनाला सहकार्य करावे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. 

टॅग्स :nagpurनागपूरAnil Deshmukhअनिल देशमुखcorona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालयPoliceपोलिस