शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

coronavirus: नागपुरात कोरोना रुग्णांची लुबाडणूक, सिटी स्कॅनचे मनमानी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 08:12 IST

coronavirus: कोरोना आजाराची भीती व त्यावरील उपचार हे मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. काही खासगी इस्पितळातील लूट आणि मनपा किंवा शासकीय रुग्णालयात नेल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत शहरातील सर्व गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत. 

नागपूर :  कोरोना आजाराची भीती व त्यावरील उपचार हे मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. काही खासगी इस्पितळातील लूट आणि मनपा किंवा शासकीय रुग्णालयात नेल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत शहरातील सर्व गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रांमध्ये सिटी स्कॅनचा दर २५०० रुपये निश्चित केला आहे. असे असताना, काही खासगी केंद्र ३५०० ते ४५०० रुपये शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. कोरोना विषाणू फुप्फुसांना पोखरत असल्याने डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना छातीचा ‘एचआर सिटी स्कॅन’ करण्याचा सल्ला देतात. मागील वर्षी याचा फायदा काही खासगी केंद्र घेत असल्याच्या  तक्रारी झाल्या. राज्यात सिटी स्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली. या समितीने खासगी केंद्रांना कोरोना रुग्णांच्या एच. आर. सिटी स्कॅनसाठी जास्तीत जास्त २५०० रुपये दर आकारण्याचे निर्देश दिले. परंतु काही मोजकी केंद्रे वगळता बहुसंख्य केंद्र दुपटीने रक्कम रुग्णांकडून वसूल करीत असल्याचे दिसून येत आहेत. याबाबत माहिती असूनही मनपाचे अधिकारी कारवाईसाठी धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिटी स्कॅन यंत्राच्या स्लाईसनुसार कोरोनाबाधितांच्या चाचणीचे दर शासनाने निश्चित केले आहेत. १६ स्लाईसच्या आत असलेल्या सिटी स्कॅनचे दर २००० आहेत. १६ ते ६४ स्लाईस सिटी स्कॅनचे दर २५०० तर ६४ स्लाईसहून जास्त असलेल्या सिटी स्कॅनचे दर ३००० ठरवून दिले आहेत. -डॉ. राजू खंडेलवाल, वरिष्ठ रेडिओलॉजिस्टसरकारने कोरोनाबाधितांचा ‘एच. आर. सिटी स्कॅन’साठी निश्चित केलेला २५०० रुपये दरच आकारला जात आहे. हा दर तसा कमी आहे. यासाठी संघटनेकडून न्यायालयात दाद मागितली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच दर आकारावे, असे आवाहन आहे.                                               -डॉ. संदीप महाजन, अध्यक्ष,                  विदर्भ रेडिओलॉजिकल ॲण्ड इमेजिंग असोसिएशन

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर