शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : सामाजिक वातावरण दूषित करू पाहणाऱ्या उपद्रवी कोरोना बाधिताविरुद्ध गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 20:11 IST

आपल्याला काहीच झाले नव्हते. जबरदस्तीने आपल्याला क्वॉरेटाईन करण्यात आल्याचा कांगावा त्याने सुरू केला होता.

नागपूर -  मेडिकल मधून सुट्टी झाल्यानंतर घरी पोहोचलेल्या एका कोरोना बाधितांने सामाजिक वातावरण दूषित करू पाहणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिरुल मोहम्मद (वय ३४) असे या उपद्रवी व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो व्यापारी असून तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. टोपी विकण्याचा व्यवसाय करणारा जमिरुल १३ मार्चला दिल्लीला गेला होता. तेथून माल खरेदी करून तो १५ मार्चला नागपुरात आला. त्याची दिल्ली ट्रॅव्हल हिस्ट्री कळाल्यानंतर त्याला एमएलए होस्टेल नागपूर येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविन्यात आले. ४ तारखेला तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दरम्यान, त्याच्या सोबतच त्याच्या कुटुंबातील ७ आणि आजूबाजूला राहणाऱ्या, संपर्कात आलेल्या ३९ व्यक्तींनाही क्वॉरेटाईन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी लाल साहेब चौक, कादर चौक, टिमकी, मोमिनपुरा आणि भगवाघर चौक हा परिसर सील केला. दरम्यान, उपचार करून त्याला शुक्रवारी रात्री सुट्टी देण्यात आली. जमीरउल रात्री घरी पोहोचला आणि काही वेळातच त्यांनी उपद्रव सुरू केला. स्वतःचे डिस्चार्ज रिपोर्ट त्याने सोशल मीडियावर अपलोड केले. आपल्याला काहीच झाले नव्हते. जबरदस्तीने आपल्याला क्वॉरेटाईन करण्यात आल्याचा कांगावा त्याने सुरू केला. शनिवारी सकाळी हा प्रकार कळाल्यानंतर त्याच्या उपद्रवाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांनी तहसील पोलिसांकडे धाव घेत जमीरउल विरुद्ध तक्रार दिली.  त्यावरून तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर यांनी जमीरउल विरुद्ध भादवीच्या कलम १८८,१८६, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम ३ नुसारशनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि पोलिसांचे पथक पुन्हा जमिरुलच्या घरी धडकले. वृत्त लिहिस्तोवर जमीरउल ला ताब्यात घेऊन क्वॉरेटाईन करण्यातची प्रक्रिया सुरू होती.यापूर्वीही केला उपद्रव आरोपी जमीरुल याने त्याला क्वॉरेटाईन करून एमएलए होस्टेलच्या अलगीकरण कक्षात ठेवले असता तो तिथेही उपद्रव करीत होता. त्याने मोबाईल वरून अनेकांचे फोटो काढले. शिवाय इकडे तिकडे तो फिरत होता. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून तेथील व्यवस्था चांगली नसल्याच्या तक्रारी करूनही त्याने प्रशासनाला नाहक त्रास देण्याचा उपद्रव केला होता, अशी माहितीपुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पोलिसांचे प्रशासनाला पत्र कोरोना बाधित असल्याने जमीरुल मुळे आधीच परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. उपचारानंतर सुटी झाल्यावर त्याने स्वतःची, कुटुंबातील सदस्यांची आणि इतरांची पुरेशी काळजी न घेता सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गंभीर असून त्याची एकूणच वृत्ती बघता त्याला पुन्हा क्वॉरेटाईन करण्यात यावे, अशी सूचनावजा मागणी पोलिसांनी प्रशासनाकडे शनिवारी एका पत्रातून केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी