अभिजित वंजारी यांना कोरोनाची लागन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST2020-12-13T04:25:21+5:302020-12-13T04:25:21+5:30
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात विजय मिळविणारे आ. अभिजित वंजारी हे शनिवारी केलेल्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आलेले ...

अभिजित वंजारी यांना कोरोनाची लागन
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात विजय मिळविणारे आ. अभिजित वंजारी हे शनिवारी केलेल्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. वंजारी यांनी सोशल मीडियावर हे जाहीर करीत आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.वंजारी यांनी ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यानंतर ते गुरुवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचे शुभचिंतक व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यानंतर शुक्रवारी त्यांनी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी ते स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींसह अनेकांच्या संपर्कात आले. याशिवाय अनेक नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी निवासस्थानी जाऊन वंजारी यांची भेट घेतली. आता वंजारी पॉझिटिव्ह आल्याने अनेकांना चाचणी करून घ्यावी लागणार असून त्यांची चिंता वाढली आहे.