Corona's first death in Nagpur; 33 positive patients in Vidarbha | Corona Virus in Nagpur; नागपुरात कोरोनाचा पहिला मृत्यू; विदर्भातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32

Corona Virus in Nagpur; नागपुरात कोरोनाचा पहिला मृत्यू; विदर्भातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32

ठळक मुद्देचंद्रपूर एक तर बुलडाण्यात दोन पॉझिटिव्हविदर्भात एकाच दिवशी पाच रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा पहिल्या मृत्यूची नोंद सोमवारी नागपुरात झाली. विशेष म्हणजे, मृतकाची कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना तो पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या शिवाय, चंद्रपूर एक-एक तर बुलडाण्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विदर्भात एकाच दिवशी पाच रुग्ण आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. नागपूर सतरंजीपुरा येथील रहिवासी असलेले ६८ वर्षीय रुग्णाला हगवण आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी रात्री १०वाजताच्या सुमारास मेयोच्या वॉर्ड क्र. ५ मध्ये दाखल केले. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह मेयोच्या शवविच्छेदन गृहात ठेवून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. सोमवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला. मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचा प्रवासाचा इतिहास नाही. तरीही पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला पुढील काही दिवस सतरंजीपुऱ्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. या भागात कुणाला लक्षणे दिसताच त्यांनी मेयो, मेडिकलमध्ये दाखल होण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

पॉझिटिव्ह रुग्णासोबत चार जोडपे होते प्रवासाला
चंद्रपूर येथील रहिवासी असलेला ३९ वर्षीय रुग्ण हा इण्डोनेशिया ते दिल्ली आणि तेथून विमानााने २४ मार्च रोजी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर पोहचला. या रुग्णासोबत त्याची पत्नी आणि आणखी तीन जोडपे होते. या आठही प्रवशांना आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. यातील केवळ ३९ वर्षीय पुरुषाचे नमुनाची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु नमुना तपासायला लागलेला उशीर व आमदार निवासात १३ दिवसांचे वास्तव यामुळे अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहे.

७७ नमुने निगेटिव्ह
‘अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थे’च्या (एम्स) मायक्रोबायलॉजी विभागाच्या प्रयोगशाळेत आज सोमवारी पहिल्या टप्प्यात २५ तर दुसºया टप्प्यात ५३ नमुने तपासण्यात आले. यातील एक पॉझिटिव्ह तर उर्वरीत ७७ नमुने निगेटिव्ह आले. मेयोमधील बंद पडलेले तपासणी यंत्र आज सुरू करण्यात आले. परंतु यात बराच वेळ गेल्याने या प्रयोगशाळेतून रात्री उशीरापर्यंत नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नव्हता.

विदर्भातील कोरोनाची स्थिती
जिल्हा             रुग्ण           मृत्यू
नागपूर             १८              १
बुलडाणा         १०               १
गोंदिया             १               ०
चंद्रपूर              १               ०
वाशिम             १                १
अमरावती          १              १
 

 

Web Title: Corona's first death in Nagpur; 33 positive patients in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.