शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

नागपुरात कोरोना विषाणू तपासणारे यंत्र पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 8:31 PM

विदर्भासह छत्तीसगड व मध्य प्रदेशातील कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याची जबाबदारी असलेल्या नागपुरातील मेयोच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र शुक्रवारी अचानक बंद पडले.

ठळक मुद्देविदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेशातील शेकडो नमुने प्रलंबित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भासह छत्तीसगड व मध्य प्रदेशातील कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याची जबाबदारी असलेल्या नागपुरातील मेयोच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र शुक्रवारी अचानक बंद पडले. दिल्ली व मरकजमधील शेकडो संशयितांचे नमुने प्रलंबित पडले आहेत.इंदिरा गांधी शासकीय व वैद्यकीय रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत आतापर्यंत ७६७ नमुने तपासण्यात आले आहेत. विदर्भात बाधित रुग्णांची संख्या वाढताच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे मोठ्या संख्येत नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. कोरोना संशयित नमुने तपासणीसाठी मेयोच्या प्रयोगशाळेत जुने व नवे असे दोन ‘पॉलिमर चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) यंत्र आहे. जुन्या यंत्राची मर्यादा केवळ १८ नमुन्यांची तर नव्या यंत्राची मर्यादा ३०वर नमुन्यांची आहे. या दोन्ही यंत्रांवर काम सुरू होते. तीन पाळीत रोज १००वर नमुने तपासले जात होते. यातच गेल्या दोन दिवसांत दिल्ली व मरकजमधून विदर्भात आलेल्या संशयित व्यक्तींच्या नमुन्यांचाही भार वाढला आहे. असे असताना, आज अचानक दुपारी नवीन यंत्र बंद पडले. संबंधित कंपनीला याची माहिती देण्यात आली. परंतु सायंकाळपर्यंत हे यंत्र सुरू झाले नव्हते. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री तपासण्यात आलेल्या यंत्रावरील ८७ नमुने निगेटिव्ह आले होते. तर आज शुक्रवारी जुन्या यंत्रावर लावण्यात आलेल्या आठ नमुन्यांमधून वाशिम जिल्ह्यातील एक पॉझिटिव्ह तर उर्वरित सात नमुने निगेटिव्ह आले.एम्स, मेडिकलमध्ये सोमवारपासून तपासणी!नागपूरच्या मेडिकल व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत नुकतेच ‘पीसीआर’ यंत्र उपलब्ध झाले आहे. येत्या सोमवारपासून या यंत्रावर कोरोना संशयितांचे नमुने तपासणे सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु याला दोन्ही रुग्णालयाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.यंत्र दुरुस्त करण्याचा प्रयत्ननवे ‘पीसीआर’ यंत्र बंद पडले आहे. दुरुस्तीचा प्रयत्न सुरू आहे. जुन्या यंत्रावर नमुने तपासले जात आहेत. परंतु या यंत्राची मर्यादा १८ नमुने तपासण्याची आहे. प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढली आहे. नमुन्यांना फ्रीजमध्ये विशिष्ट तापमानावर स्टोअर केले जात आहे. लवकरच यंत्र सुरू होईल ही अपेक्षा आहे.डॉ. अशोक केवलिया, अधिष्ठाता, मेयो

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)