शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

Corona virus : हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 8:49 PM

पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.

ठळक मुद्देजनतेने सक्तीची वेळ आणू नये : नागरिकांनी संशयितांची नावे कळवावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयातील जनप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यांनी हे आवाहन केले. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.राऊत म्हणाले, जनतेने राष्ट्राचा विचार करावा. लोकांच्या सहकार्याची आज गरज आहे. रुग्णांच्या घरावर पोलिसांची नजर असून त्यांना घरीच कोरोंटाईन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. संशयित रुग्ण मोकळे फिरत असल्याचे यावेळी पत्रकारांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. कोरोनासंदर्भात विदेशी पर्यटकांची यादी प्रशासनाने तयार केली आहे.विदेशातून आलेल्या लोकांनी स्वत:हून आपली माहिती कळवावी आणि उपचार करून घ्यावेत. जनतेला सुद्धा अशा नागरिकासंदर्भात माहिती असेल तर त्यांनी त्यांची नावे प्रशासनाला द्यावी. भविष्यात गरज पडली तर ट्रान्सपोर्ट बंदचा देखील विचार करावा लागेल. राज्यात आणीबाणी आणि आपत्कालीन कायदा लागू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची काळजी सर्वांनी घ्यावी, अन्यथा प्रशासनाला सक्ती करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.जनता स्वयंस्फूर्तीने प्रसार रोखण्यासाठी पुढे येत आहे. प्रशासनाच्या कामामुळे आणि वैद्यकीय सेवेमुळे ही परिस्थिती नियंत्रणात असल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.या पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीत कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा मंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मिश्रा, मेयोचे डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मजूरवर्गांसाठी नियोजन करण्याचा सरकारचा विचारनितीन राऊत म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत प्रशासनाने बंदी घातल्याने मजूरवर्गाची अडचण झाली आहे. हे आम्ही समजू शकतो. ३१ मार्चनंतर अशीच परिस्थिती कायम राहिली तर त्यांना कशी मदत करता येईल याचे नियोजन आम्ही करू. या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवर स्वत: नियंत्रण ठेवून आहेत.टोल नाक्यांवर होणार तपासणीकोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात येणाऱ्या टोल नाक्यावर तसेच आंतरराज्य सीमेवर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. आठवडी बाजार बंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या साथीचा दुसरा टप्पा सुरू असून याचा उद्रेक वाढू नये याची खबरदारी घेण्यात आल्याची ग्वाही राऊत यांनी यावेळी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Rautनितीन राऊत