CoronaVirus in Nagpur जागतिक आरोग्यदिनी ‘कोरोना’चा ‘ब्लास्ट’ : सर्वाधिक ६६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:51 PM2021-04-07T23:51:53+5:302021-04-07T23:53:56+5:30

Corona Blast जागतिक आरोग्यदिनी नागपूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा अक्षरश: स्फोट झाला. २४ तासांत जिल्ह्यामध्ये तब्बल ५ हजार ३३८ नवीन बाधितांची नोंद झाली, तर सर्वाधिक ६६ लोकांचा मृत्यू झाला.

Corona Virus in Nagpur World Health Day Corona Blast: 66 Deaths | CoronaVirus in Nagpur जागतिक आरोग्यदिनी ‘कोरोना’चा ‘ब्लास्ट’ : सर्वाधिक ६६ मृत्यू

CoronaVirus in Nagpur जागतिक आरोग्यदिनी ‘कोरोना’चा ‘ब्लास्ट’ : सर्वाधिक ६६ मृत्यू

Next
ठळक मुद्देपाच हजारांहून अधिक रुग्णसंख्येचा नकोसा ‘रेकॉर्ड’, २४ तासांत दैनंदिन रुग्णांत ४२ टक्क्यांनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जागतिक आरोग्यदिनी नागपूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा अक्षरश: स्फोट झाला. २४ तासांत जिल्ह्यामध्ये तब्बल ५ हजार ३३८ नवीन बाधितांची नोंद झाली, तर सर्वाधिक ६६ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा आकडा असून, एक नको असणारा विक्रम नोंदविला गेला आहे. बुधवारच्या आकडेवारीमुळे शहरातील धोका आणखी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रविवारी जिल्ह्यात ४ हजार ११० ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले होते, तर एका दिवसात सर्वाधिक ६४ मृत्यूंची नोंद १७ सप्टेंबर रोजी झाली होती. बुधवारी हे दोन्ही आकडे पार झाले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी १ हजार ५८० म्हणजेच ४२ टक्के रुग्ण वाढले.

ग्रामीणमध्ये वाढतोय धोका

शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमधील स्थिती आणखी चिंताजनक झाली आहे. बुधवारी शहरात ३४, तर ग्रामीणमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. ७ जण जिल्ह्याबाहेरील होते. बाधितांपैकी २ हजार ४८ ग्रामीण भागातील होते. प्रथमच ग्रामीणचा आकडा दोन हजारांच्या पार गेला.

एकूण बाधित अडीच लाखपार

मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून ते बुधवारपर्यंत जिल्ह्यामध्ये अडीच लाख बाधितांचा आकडादेखील पार झाला. आतापर्यंत एकूण २ लाख ५४ हजार २२१ बाधित आढळले असून, मृत्यूचा आकडा ५ हजार ५०४ इतका झाला आहे.

१९ हजार चाचण्या

चाचण्यांची एकूण संख्या १९ हजार १९१ इतकी होती. यात शहरातील १० हजार ४४८ व ग्रामीणमधील ८ हजार ७४३ नमुने होते. आतापर्यंत जिल्ह्यात १७ लाख ३८ हजार ५९८ चाचण्या झाल्या आहेत.

सक्रिय रुग्ण ४३ हजारांहून अधिक

बुधवारी ३ हजार ८६८ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील २ हजार ८९० व ग्रामीणमधील ९७८ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४२ हजार ९३३ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील २९ हजार ४५ व ग्रामीणमधील १३ हजार ८८८ जणांचा समावेश आहे. सरकारी व खाजगी इस्पितळांत ११ हजार २३५ रुग्ण दाखल आहेत, तर ३१ हजार ६९८ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.

एप्रिलमधील रुग्णसंख्या

दिनांक : नवे बाधित : मृत्यू

१ एप्रिल : ३,६३० : ६०

२ एप्रिल : ४,१०८ : ६०

३ एप्रिल : ३,७२० : ४७

४ एप्रिल : ४,११० : ६२

५ एप्रिल : ३,५१९ : ५७

६ एप्रिल : ३,७५८ : ५४

७ एप्रिल : ५,३३८ : ६६

Web Title: Corona Virus in Nagpur World Health Day Corona Blast: 66 Deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.