लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६६ नमुने पॉझिटिव्ह आले. यासोबतच मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे, तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,५७१ वर पोहोचली. तसेच आज ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत १६३५ (६३ टक्के) रुग्ण बरे झालेले आहेत.मेयोमध्ये पारडी येथील ३० वर्षीय युवकाला मृतावस्थेत आणण्यात आले होते. डॉक्टरांनी सावधगिरी पाळत युवकाची कोविड-१९ चाचणी केली तेव्हा तो पॉझिटिव्ह आढळून आला. संशयास्पद अवस्थेत मृतास आणले गेले होते. तसेच मेडिकलमध्ये यवतमाळ येथील ६३ वर्षीय पुरुषाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना गंभीर गॅस्ट्रोएन्ट्रायटिस, श्वास घेण्याची समस्या होती. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता त्यांना भरती करण्यात आले होते. त्यांचा रिपोर्टही आज कोरोना पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.नागपूर महापालिकेतर्फे जारी करण्यात आलेल्या अहवालात सांगण्यात आले की, नागपूर शहरात बुधवारी सायंकाळपर्यंत २९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात नाईक तलाव बांगलादेशचे ४, बारी चौक येथील २, हसनबाग येथील २, शिवाजीनगरमधील २, पारडीत १, डायमंडनगर, गोधनी, ज्योतीनगर खदान, जुनी मंगळवारी, गोळीबार चौक, जेल परिसर, गोकुळ अपार्टमेंट नरेंद्रनगर, भाऊसाहेब सुर्वेनगर, मानकापूर, वसंतनगर, मेडिकल, शांती अपार्टमेंट सुयोगनगर, मिनीमातानगर आणि भारतनगर कळमना येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. खासगी रुग्णालयातील ३ रुग्ण आहेत. यामुळे ३७ रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आहेत.ग्रामीण भागातील ४५९ रुग्णएकूण संसर्गित २,५७१ रुग्णांपैकी ४५९ रुग्ण हे नागपूर ग्रामीण भागातील आहेत, तर ९० रुग्ण नागपूर जिल्ह्याबाहेरचे आहेत. नागपूर जिल्ह्यात मृत ४० रुग्णांपैकी ३५ नागपूर शहर व जिल्ह्यातील आहेत, तर १५ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत.
CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन मृत्यू, ६६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:39 IST
नागपूर जिल्ह्यात बुधवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६६ नमुने पॉझिटिव्ह आले. यासोबतच मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे, तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,५७१ वर पोहोचली. तसेच आज ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत १६३५ (६३ टक्के) रुग्ण बरे झालेले आहेत.
CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन मृत्यू, ६६ पॉझिटिव्ह
ठळक मुद्देशहरातील २९, ग्रामीणचे ३७ रुग्ण