शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus in Nagpur : नागपुरात तिघांचा मृत्यू, १२२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:19 IST

नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १२२ नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मृतांची संख्या ६३ झाली असून, कोरोनाच्या एकूण संक्रमितांची संख्या ३२९३ झाली आहे.

ठळक मुद्दे शहरात ६४, ग्रामीणमध्ये ५८ संक्रमित : १३२ रुग्ण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १२२ नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मृतांची संख्या ६३ झाली असून, कोरोनाच्या एकूण संक्रमितांची संख्या ३२९३ झाली आहे. आज झालेल्या पॉझिटिव्हमध्ये शहरातील ६४ व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यात विशेष बाब म्हणजे १३२ लोक निरोगी होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण २११३ रुग्ण निरोगी होऊन परतले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या १११९ आहे.मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान कामठी येथील ६० व ५४ वर्षीय महिला पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांना न्यूमोनिया होता. श्वास घेण्यास त्रास होत होता. मेडिकलमध्ये भरती असलेल्या धंतोली येथील ७५ वर्षीय पुरुषाचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. त्याला २० जुलै रोजी भरती करण्यात आले होते. सर्दी, ताप व श्वास घेण्यास त्रास होत होता. हायपरटेंशनसोबतच डायबिटीजसुद्धा होते. बुधवारी सायंकाळी ५ वाजता मेयोच्या लॅबमधून २९, मेडिकल येथून ५, एम्स १६, नीरी ४, खासगी लॅब ४२, अ‍ॅन्टिजन टेस्ट २६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकूण २२१९ नमुने घेण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात ५३,५०६ नमुने घेण्यात आले आहेत. एकूण संक्रमित ३२९३ मधून ७२६ नागपूर ग्रामीणचे व ९३ संक्रमित जिल्ह्याबाहेरचे आहेत.येथे सापडले रुग्णमहापालिकेतर्फे बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली. यात धंतोली येथील ७, भारतनगर ३, हनुमाननगरात १, झिंगाबाई टाकळी १, काटोल रोड ३, हंसापुरी १, सहयोगनगर १, समतानगर १, जागृतीनगर १, गोरेवाडा २, राजीवनगर अजनी ४, शांतिनगर २, सोनेगाव १, स्मॉल फॅक्टरी एरिया १, काचीपुरा १, कडबी चौक १, विदर्भ हाऊसिंग बोर्ड १, निर्मल नगरी १, आनंदनगर जयताळा १, म्हाळगीनगर १, टिळकनगर १, ओएफएजे डिफेन्स १, दिघोरी १, मोहननगर १, नरेंद्रनगर १, गंगाबाई घाट १, तीन नल चौक १, भानखेडा २, तांडापेठ १, तीन खंबा १, गणेशपेठ १, शताब्दीनगर १, मोठा ताजबाग १, शिवाजीनगर १, प्रगतीनगर १, रामकृष्णनगर १, मानकापूर १, लक्ष्मी अपार्टमेंट धरमपेठ १, पोलीसनगर हिंगणा रोड १, सूर्यनगर १, अजितनाथ सोसायटी शताब्दीनगर १, कपिलनगर नारा १, कॉपोर्रेशन कॉलनी १, पुष्पांजली अपार्टमेंट ३, गुलशननगर १ आणि शहराच्या बाहेरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात ५८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात कामठीमध्ये २७, कन्हान ११, काटोल २, रामटेक २, बुटीबोरी ४, हिंगणा ६, खापा २; तसेच उमरेड, कुही, बोखारा आणि पारशिवनी येथे प्रत्येकी १ पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे.कामठीत नगराध्यक्षासह २७ बाधितकामठीत कोरोना बाधितांचा ग्राफ वाढतीवर आहे. बुधवारी कामठीचे नगराध्यक्ष शहाजहां शफाहत यांच्यासह तालुक्यातील २७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.उपचार सुरू असलेले - १११९उपचारानंतर बरे झालेले - २११३मृत - ६३

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर