शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

CoronaVirus in Nagpur : नागपुरात संक्रमितांचा आकडा ११०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:08 IST

नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणून बुधवारी ४५ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले. यात नाईक तलाव व बांगलादेशच्या २४ रुग्णांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान कांद्री निवासी ५० वर्षीय पुरुष दहा दिवसांपूर्वी मुंबईतून परतला होता. त्याला सर्दी, खोकला व ताप होता. त्याने स्थानिक पातळीवर उपचार केला. परंतु बुधवारी सकाळी त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. सकाळी १० वाजता त्याचा घरीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कोविडच्या तपासणीसाठी मेयोत आणण्यात आला. सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला.बुधवारी नीरीच्या लॅबमधून तपासण्यात आलेल्या १५१ नमुन्यापैकी १० नमुने पॉझिटिव्ह आले. यात ६ नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. तर ४ वानाडोंगरी येथील आहेत. नाईक तलावचे पॉझिटिव्ह व्हीएनआयटीमध्ये क्वॉरंटाईन होते. मेडिकलच्या लॅबमधून ७ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. यातील तीन रुग्ण सिम्बॉयसिसमध्ये क्वॉरंटाईन होते. माफसूच्या लॅबमधून ४, खाजगी लॅबमधून ३ नमुने पॉझिटिव्ह आले. एम्सच्या लॅबमधून ६५ नमुने तपासण्यात आले. यातून दोन नमुने नागपूर तसेच एक ब्रह्मपुरीतील नमुना पॉझिटिव्ह आला.तीन दिवसात १०० रुग्णनागपुरात संक्रमितांची संख्या जून महिन्यात वेगाने वाढत आहे. १४ जून रोजी संक्रमित १००५ होते. अवघ्या तीन दिवसात हा आकडा ११०५ पर्यंत पोहचला. १ जून ते १७ जून दरम्यान ५६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३१ मेपर्यंत नागपुरात ५४० रुग्ण होते. तर मार्च महिन्यात १६, एप्रिल महिन्यात १२२, मे महिन्यात ४०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जून महिन्यात संक्रमितांची संख्या वाढत आहे.४५ रुग्ण परतले घरीबुधवारी ४५ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले. यात मेयोतून २७, मेडिकलमधून ११ व एम्समधून ७ रुग्णांचा समावेश आहे. मेयोतून नाईक तलाव - बांगलादेशचे १९, सतरंजीपुरा येथील ४, पाचपावली १, सावनेर १, खापरखेडा १, हंसापुरीतील १ रुग्णाला डिस्चार्ज मिळाला. मेडिकलमधून नाईक तलाव-बांगलादेशचे ५, टेकडीवाडी १, गांधीबाग ४, आठवा मैल १ रुग्ण घरी परतले. एम्सतून डिस्चार्ज झालेल्या रुग्णाच्या एरियाची माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर