शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

CoronaVirus in Nagpur : नागपुरात बाधितांच्या तुलनेत कोरोना मुक्तांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:32 PM

कोरोनाबाधितांचा वेग मागील १२ दिवसांपासून मंदावला आहे. यातच रोजच्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्याही अधिक राहू लागली आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे३६ रुग्णांचा गेला जीव : १,०३१ रुग्ण पॉझिटिव्ह, १,१९७ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांचा वेग मागील १२ दिवसांपासून मंदावला आहे. यातच रोजच्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्याही अधिक राहू लागली आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी १,०३१ नव्या रुग्णांची नोंद तर १,१९७ रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यूच्या संख्येतही घट आली आहे. आज ३६ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकू ण संख्या ७९,०४३ तर मृतांची संख्या २,५४६ वर पोहचली आहे.नागपूर जिल्ह्यात ६,३०० रुग्णांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. यात शहरातील ३,२५५ तर ग्रामीणमध्ये ३८९ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणीत ६५८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी शहरातील १,९८८ तर ग्रामीणमध्ये ६६८ रुग्णांची करण्यात आली. या चाचणीत ३७३ रुग्ण पॉझिटिव्ह तर २,२८३ रुग्ण निगेटिव्ह आले. आज बाधित आलेल्या रुग्णांमध्ये ७०८ रुग्ण शहरातील, ३२० रुग्ण ग्रामीणमधील तर तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. मृतांमध्ये शहरातील २९, ग्रामीणमधील चार तर जिल्ह्याबाहेरील तीन मृतांचा समावेश अहे. आतापर्यंत ६३,६६४ रुग्ण बरे झाले आहेत. याचे प्रमाण ८०.५५ टक्के आहे.चाचण्यांची संख्या कमी, तरी ३० तासानंतर रिपोर्टशहरात पाच शासकीय व चार खासगी प्रयोगशाळा असताना आणि महानगरपालिकेने प्रत्येक झोनमध्ये चाचणी केंद्र सुरू केले असतानाही चाचण्यांची संख्या वाढलेली नाही. यातच आजपासून १२ फिरत्या बसेसमधून कोविडची चाचणीला सुरुवात झाली. परंतु याचा फारसा प्रभावही दिसून आलेला नाही. विशेष म्हणजे, अलीकडे रोज १००० रुग्णांची भर पडत असताना त्यांच्या संपर्कातील किमान आठ संशयितांची तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही. शिवाय, मागील आठवड्यापासून रुग्णांना नमुन्यांचा रिपोर्ट मिळण्यास तब्बल ३० तासांचा वेळ लागत आहे.मेयो, मेडिकलमध्ये मृतांचा आकडा हजारावरमार्च महिन्यापासून नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू मेयो रुग्णालयात झाला. तेव्हापासून मृत्यूचे सत्र सुरू झाले. या सात महिन्याच्या कालावधीत मेयो, मेडिकलमध्ये मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. मेयोमध्ये १०१४ तर मेडिकलमध्ये १,१११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एम्समध्ये ११ मृत्यू झाले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,३००बाधित रुग्ण : ७९,०४३बरे झालेले : ६३,६६४उपचार घेत असलेले रुग्ण : १२,८३३मृत्यू :२,५४६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर