शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

CoronaVirus in Nagpur : दुसऱ्या दिवशीही ५०० च्या आत रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 23:29 IST

CoronaVirus कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील तीन महिने हैराण केल्यानंतर आता दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशी नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५०० च्या आत नोंदविली गेली.

ठळक मुद्दे:शहरात २१३ रुग्ण, ४ मृत्यू : जिल्ह्यात ४७० रुग्ण, २५ मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील तीन महिने हैराण केल्यानंतर आता दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशी नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५०० च्या आत नोंदविली गेली. मंगळवारी ४७० रुग्ण व २५ मृत्यू झाले. परंतु सोमवारी शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये कमी झालेली रुग्णसंख्या मंगळवारी पुन्हा वाढली. शहरात २१३ रुग्ण व ४ मृत्यू तर ग्रामीणमध्ये २४६ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली.

कोरोनाचे २५ दिवसांत रुग्णसंख्या कमी झाल्याने आरोग्य व्यवस्थेवरील मोठा ताण कमी झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातही आता स्थिती नियंत्रणात येत आहे. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी चाचण्यांची संख्या वाढून १४,१४५ वर पोहोचली. यात ग्रामीणमध्ये ५,६८० तर शहरात ८,४६५ चाचण्या झाल्या. चाचण्यांच्या तुलनेत ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हिटीचा दर ४.३३ टक्के तर शहरात २.५१ टक्के होता. जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, १९८१ रुग्ण बरे झाले. यात शहरातील ७८१ तर ग्रामीण भागातील १२०० रुग्णांचा समावेश होता. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर ९५.५१ टक्के आहे. आतापर्यंत ४,५२,३४१ रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे मृत्यू कसे रोखणार?

मागील काही दिवसांपासून शहर व ग्रामीणच्या तुलनेत जिल्ह्याबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक राहत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी ११ रुग्णांचे बळी गेले व तेवढेच रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्याबाहेरील १५२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १३४७ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे मृत्यू कसे रोखणार, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मेयो, मेडिकलमधील २० हजारावर रुग्ण बरे होऊन घरी गेले

मेयो, मेडिकलमध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या दरम्यान उपचारासाठी आलेल्या रुग्णांमधून २० हजारावर रुग्ण बरे होऊन घरी गेले. यात मेडिकलमधून १०,३६६ तर मेयोमधून १०,४३० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मेडिकलमध्ये ४३०, मेयोमध्ये १४० तर एम्समध्ये ८३ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १४,१४५

शहर : २१३ रुग्ण व ४ मृत्यू

ग्रामीण : २४६ रुग्ण व १० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७२,०११

ए. सक्रिय रुग्ण : १०,८४८

ए. बरे झालेले रुग्ण : ४,५२,३४१

ए. मृत्यू : ८,८२२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर