शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात उच्चांक, तब्बल ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह,नऊ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 23:14 IST

वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले शिवाय, नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्देशहरात १८२ तर ग्रामीणमध्ये १६० बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले शिवाय, नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ५१३४ वर पोहचली असून मृतांची संख्या ११८ झाली आहे. आज नोंद झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १८२ रुग्ण शहरातील तर १६० रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, २२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. गेल्या चार दिवसात हजार नव्या रुग्णांची तर ४० मृत्यूची भर पडली. हे धोक्याचे संकेत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. घराबोहर पडताना विशेष काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयात (मेयो) तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात ५० वर्षीय अनोळखी पुरुषाला पोलिसांनी गंभीर अवस्थेत २९ जुलै रोजी दाखल केले. उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. कामठी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. न्यू येरखेडा येथील ६५ वर्षीय पुरुषाला गंभीर अवस्थेत २६ जुलै रोजी मेयोत दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. या तिन्ही रुग्णाला निमोनिआ व श्वसनाचा विकार होता. उर्वरीत सहा रुग्णांच्या मृत्यूची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून उपलब्ध होऊ शकली नाही. आतापर्यंतच्या एकूण मृतांमध्ये ग्रामीण भागातील १८, शहरातील ७१ तर जिल्ह्याबाहेरील २९ आहेत.मेयोच्या प्रयोगशाळेतून ९६ बाधितमेयोच्या प्रयोगशाळेतून सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आले. ९६ बाधितांची नोंद झाली. मेडिकलमधून ६४, एम्समधून ६३, नीरीच्या प्रयोगशाळेमधून ३७, माफसूमधून ८, खासगी लॅबमधून ६२, अ‍ॅन्टिजन चाचणीतून १२ असे एकूण ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये किंवा होम आयसोलेशन केले जात असलेतरी मेयो, मेडिकलमध्ये ३०० वर रुग्ण उपचार घेत आहेत.या वसाहतीतून पॉझिटिव्ह रुग्ण आलेमहानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये चांभार मोहल्ला १, शताब्दी चौक १, सीताबर्डी २, नारी ३, सीए रोड ४, हुडकेश्वर २, मानेवाडा २, जीएमसी मेडिकल ९, गणेशपेठ १, सदर २, गोळीबार चौक २, वर्धमाननगर ९, दिघोरी ४, मंगळवारी बाजार १२, अवस्थीनगर मानकापूर १, चंद्रनगर १, लकडगंज १, टेकडी वाडी ९, बोरगाव १, वाठोडा १, घाटरोड १, गांधीबाग १, रानू कॉन्व्हेंट शाळेजवळ १, न्यू बाभूळखेडा १, म्हाळगीनगर २, पाचपावली ४, दुर्गानगर १, पिवळी नदी परिसर ३, सोमलवाडा १, नंदनवन ४, सुरेंद्रनगर १, धंतोली १, मोहननगर १, जरीपटका ३, हसनबाग १, गिट्टीखदान १, इंदोरा २, महाल ५, इतवारी ३, रामदासपेठ १, हनुमाननगर २, गड्डीगोदाम २, धरमपेठ ३, सेमिनरी हिल्स १, रेशीमबाग ३, गंगाबाई घाट रोड १, पारडी १, टेकानाका १, नरसाळा रोड १, खरबी रोड १, भांडे प्लॉट १, देशपांडे ले-आऊट १, गणेश टेकडी परिसर १ असे एकूण १२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.दैनिक संशयित :१८६बाधित रुग्ण : ५१३४बरे झालेले : ३२९४उपचार घेत असलेले रुग्ण : १७२२मृत्यू : ११८

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर