CoronaVirus in Nagpur : नागपुरात महिनाभरानंतर कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:52 PM2020-10-02T22:52:08+5:302020-10-02T22:54:32+5:30

Corona Virus, death , Nagpur news कोरोना रुग्णसंख्येचा वेग हजाराच्या दरम्यान असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यात सर्वाधिक, ६४ रुग्णांच्या बळीची नोंद झाली. शुक्रवारी ही संख्या २८ वर आली.

Corona Virus in Nagpur: Corona death toll in Nagpur drops after a month | CoronaVirus in Nagpur : नागपुरात महिनाभरानंतर कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

CoronaVirus in Nagpur : नागपुरात महिनाभरानंतर कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णसंख्येचा वेग हजाराच्या दरम्यान असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यात सर्वाधिक, ६४ रुग्णांच्या बळीची नोंद झाली. शुक्रवारी ही संख्या २८ वर आली. तब्बल महिनाभरानंतर मृत्यूची संख्या कमी झाली. आज ९२५ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७९,९६८ तर मृतांची संख्या २,५७४ वर पोहचली.
जिल्ह्यात आज आरटीपीसीआरच्या ३,५३२ रुग्णांच्या चाचण्या तर रॅपिड अ‍ॅन्टिजेनच्या २,४१३ अशा एकूण ५,९४५ चाचण्या झाल्या. तज्ज्ञांच्या मते, रोज हजारावर रुग्णांची नोंद होत असताना किमान त्यांच्या संपर्कातील आठ संशयित रुग्णांच्या म्हणजे आठ हजार तपासण्या होणे आवश्यक आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६३१, ग्रामीणमधील २९३ तर जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील २२, ग्रामीणमधील पाच तर जिल्ह्याबाहेरील एक रुग्ण आहे. रोजच्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. १,५१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६५,१७७ वर पोहचली असून याचे प्रमाण ८१.५० टक्के आहे.

५०२० रुग्ण निगेटिव्ह
आज एकूण झालेल्या चाचण्यांतून ५०२० रुग्ण निगेटिव्ह आले. यात अ‍ॅन्टिजेन चाचणीत २२७ रुग्ण पॉझिटिव्ह तर २,१८६ रुग्णांना कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच एम्सच्या प्रयोगशाळेतून ३८ पॉझिटिव्ह तर २६६ निगेटिव्ह, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून १४ पॉझिटिव्ह तर ६४२ निगेटिव्ह, मेयोच्या प्रयोगशाळेतून १३१ पॉझिटिव्ह तर ६३७ निगेटिव्ह, माफसूच्या प्रयोगशाळेतून १९ पॉझिटिव्ह तर ७७ निगेटिव्ह, नीरीच्या प्रयोगशाळेतून ४७ पॉझिटिव्ह तर २२९ निगेटिव्ह, खासगी लॅबमधूनही २२७ पॉझिटिव्ह तर २,१८६ रुग्ण निगेटिव्ह आल्याची नोंद झाली.

रुग्ण दुपटीचा दर ५३ दिवसांवर
नागपूर जिल्ह्यातील रुग्ण दुप्पटीचा दर २० सप्टेंबर रोजी २१.३ दिवसांवर होता. २५ सप्टेंबर रोजी हाच दर २९.१ दिवसांवर तर आज तो ५३.६ दिवसांवर आला आहे. तज्ज्ञाच्या मते, मृत्यूच्या व काहीशी रुग्णसंख्येत घट दिसून येत असली तरी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार सॅनिटायझेन व लक्षणे दिसताच चाचणी करणे आवश्यक आहे.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ५,९४५
बाधित रुग्ण : ७९,९६८
बरे झालेले : ६५,१७७
उपचार घेत असलेले रुग्ण : १२,२१७
मृत्यू : २,५७४

Web Title: Corona Virus in Nagpur: Corona death toll in Nagpur drops after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.