CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 09:30 PM2021-05-17T21:30:31+5:302021-05-17T21:32:40+5:30

Corona virus, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

Corona virus in Nagpur: After 75 days, the number of patients is less than a thousand | CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली

CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली

googlenewsNext
ठळक मुद्दे९७१ रुग्ण, ३० मृत्यू : ग्रामीणच्या तुलनेत जिल्ह्याबाहेरील मृत्यू अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

एप्रिल महिन्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले होते. शासकीयसह खासगी रुग्णालयांतील खाटांच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनही अडचणीत आले होते. या महिन्यात रोज ६ ते ७ हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत होते. २४ एप्रिल रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. ७९९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. चिंतेचे वातावरण असताना २ मेपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. मागील १७ दिवसांत वेगाने रुग्णसंख्या कमी झाली. २ मार्च रोजी ९९५ रुग्णांच्या संख्येनंतर आज पहिल्यांदाच रुग्णसंख्या हजाराखाली आली. मात्र रुग्णसंख्येसोबतच चाचण्यांच्या संख्येतही घट आली आहे. सोमवारी १३,२६१ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीचा दर ७.३२ टक्के तर, मृत्यूदर १.८४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९२ टक्क्यांवर गेला आहे.

शहरात ४८७ तर, ग्रामीणमध्ये ४७४ रुग्ण

शहरात आज ९,८१८ चाचण्या झाल्या. यातून ४८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर, ग्रामीणमध्ये ३,४४३ चाचण्यामधून ४७४ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. यावरून ग्रामीणमध्ये कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत शहरात ३,२६,२४४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये १,३६,५२९ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्याबाहेरील रुग्ण व मृत्यू रोखणार कोण?

शनिवारी शहरात ११, ग्रामीणमध्ये ९ तर जिल्हाबाहेर याच्या अधिक, १० रुग्णांचे बळी गेले आहेत. शहरात आतापर्यंत ५,१३७, ग्रामीणमध्ये २,१८४ तर जिल्ह्याबाहेरील १२५९ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू रोखणार कोण, हा प्रश्न आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांकडून प्रादुर्भाव पसरण्याचा सर्वाधिक धोका राहत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या

१५ फेब्रुवारी ४९८

२८ फेब्रुवारी ८९९

१५ मार्च २२९७

२८ मार्च ३९७०

११ एप्रिल ७२०१

२४ एप्रिल ७९९९

-अशी झाली कमी रुग्णसंख्या

२ मे ५००७

५ मे ४३९९

८ मे ३८२७

११ मे २२४३

१४ मे १९९६

१७ मे ९७१

Web Title: Corona virus in Nagpur: After 75 days, the number of patients is less than a thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.