शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ७१५ पॉझिटिव्ह, ९७९ रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:39 PM

रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ७१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ९७९ रुग्ण बरे झाले आहेत.

ठळक मुद्देबरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यावर : मृत्यूचे सत्र सुरूच, ३० रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ७१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ९७९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांची एकू ण संख्या २१,१५४ झाली आहे. परंतु मृत्यूची संख्या आजही २५ वर असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. आज ३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, बळींची संख्या ७६२ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांंमध्ये शहरातील ५८५ तर ग्रामीण भागातील १२७ रुग्ण आहेत.नागपूर जिल्ह्यात गंभीर रुग्णसंख्येचे वाढते प्रमाण व मृतांच्या संख्येत होत असलेल्या वाढीला उशिरा उपचार हे मुख्य कारण म्हणून समोर आले आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आज आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात छावणी सदर येथील ५० वर्षीय पुरुष, महाकालीनगर मानेवाडा येथील ६८ वर्षीय पुरुष, कामठी गोराबाजार येथील ५५ वर्षीय पुरुष, खरबी येथील ५३ वर्षीय महिला, कामठी मौदा येथील ५४ वर्षीय महिला, जुनी मंगळवारी येथील ६४ वर्षीय पुरुष, जयभीम चौक हिवरीनगर येथील ६६ वर्षीय पुरुष व मोठा ताजबाग येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. मेडिकलसह इतर हॉस्पिटलमधील मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. एकूणच आज शहरात २१, ग्रामीण भागात सहा तर जिल्हाबाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला.२०४१अ‍ॅन्टिजन चाचणीत ३६३ पॉझिटिव्हशहरात १०३७ तर ग्रामीणमध्ये १००४ असे एकूण २०४१ रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या करण्यात आल्या. यात ३६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एकूण चाचण्यांच्या तुलनेत रुग्णांचे प्रमाण १७.७८ टक्के आहे. मेयोमध्ये २९७ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या, यात ९४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेडिकलमध्ये ३०२ चाचण्यातून ९३, नीरीमध्ये ३१ चाचण्या केल्या असता सर्वच पॉझिटिव्ह तर खासगी लॅबमध्ये ४०७ चाचण्या केल्या असता १३४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.मेयो, मेडिकल अर्धे रिकामेमेयो व मेडिकलमधील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ६०० खाटांची सोय असताना अर्ध्या खाटा रिकाम्या आहेत. सध्या मेयोमध्ये ३०५ तर मेडिकलमध्ये ३२१ रुग्ण आहेत. एम्समध्ये ४९ रुग्ण असून, खासगी हॉस्पिटल फुल्ल आहेत. वोक्हार्टमध्ये ४२, रेडिएन्समध्ये ५७, सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये ८४, होप हॉस्पिटलमध्ये ८४, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ६८, भवानी हॉस्पिटलमध्ये ९०, लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ५१, आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये ३८, एसएमएचआरसीमध्ये ८२, आशा हॉस्पिटलमध्ये २९ रुग्ण उपचाराखाली आहेत. ५,६६३ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत १२,०३२ रुग्ण बरे झाले असून, ८,३६० रुग्ण उपचाराखाली आहेत.दैनिक संशयित : ६०,८३८बाधित रुग्ण : २१,१५४बरे झालेले : १२,०३२उपचार घेत असलेले रुग्ण : ८,३६०मृत्यू : ७६२

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर