शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

CoronaVirus in Nagpur : नागपुरात एकाच दिवसात ५९ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 11:09 PM

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू बुधवारी नोंदविण्यात आले आहे. ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देशहरात ८६४ तर ग्रामीणमध्ये ४५० रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमन न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू बुधवारी नोंदविण्यात आले आहे. ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी तीन वेळा जिल्ह्यात २४ तासात ५० कोरोना पॉझिटिव्हचा मृत्यू झाला होता. बुधवारी हा आकडा ५९ पर्यंत पोहचला आहे. यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी ५२ पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले होते. ६ सप्टेंबर रोजी ५४ तर ७ सप्टेंबर रोजी ५० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज झालेल्या ५९ मृत्यूमध्ये शहरातील ४३ तर जिल्ह्यातील ११ व शहराबाहेरील ५ लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत १४५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यात नागपूर शहरातील ११२० तर ग्रामीणच्या २०७ व जिल्ह्याबाहेरील १३१ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी संक्रमितांची संख्या थोडी घसरली आहे. बुधवारी १३१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. मंगळवारी एकाच दिवसात २२०५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. बुधवारी शहरातील ८६४ तर ग्रामीण भागातील ४५० व जिल्ह्याबाहेरील ५ रुग्ण संक्रमित आढळले आहे. आतापर्यंत संक्रमितांची संख्या ४४५५६ झाली आहे. बुधवारी ८३८० नमुने तपासण्यात आले. यात ६४७३ शहरातील व १९०७ ग्रामीण भागातील आहे. आतापर्यंत ३ लाख २० हजार ७७९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यात रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट ४२५६ व आरटी-पीसीआर टेस्ट ४१२५ लोकांची झाली आहे.११०५ रुग्ण झाले कोरोनामुक्तनागपूर जिल्ह्यात बुधवारी ११०५ कोरोना संक्रमित रुग्ण घरी परतले आहे. नागपूर शहरातील ८७६ व ग्रामीणच्या २२९ रुग्णांचा यात समावेश आहे. आतापर्यंत ३१५६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर ७०.८४ टक्के पर्यंत पोहचला आहे.खासगी लॅबमधून ५४८ पॉझिटिव्हखासगी लॅबमधून गेल्या २४ तासात १२३२ नमुने तपासण्यात आले. त्यातील ५४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. यात अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये ४३५, एम्सच्या लॅबमध्ये ३७, मेडिकल लॅबमध्ये १६६, मेयो लॅबमध्ये ११३, माफसूच्या लॅबमध्ये १, नीरीच्या लॅबमध्ये १९ नमुने पॉझिटिव्ह आले आहे.कोरोनाची स्थितीअ‍ॅक्टीव्ह - ११५३२कोरोनामुक्त - ३१५६६मृत - १४५८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू