शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

CoronaVirus in Nagpur : नागपुरात आठ दिवसात ३१० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:07 IST

लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. काही अटी घालून शिथिलता दिली आहे. परंतु बहुसंख्य लोक अटी पाळत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. मागील आठ दिवसात नागपुरात रुग्णांच्या संख्येने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. तब्बल ३१० रुग्णांची नोंद झाली. यात आज ५८ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्येची हजाराकडे वाटचाल आहे. एकूण रुग्णांची संख्या ९२१ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे५८ नव्या रुग्णांची नोंद : रुग्णसंख्या ९२१ : रुग्णसंख्येची हजाराकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. काही अटी घालून शिथिलता दिली आहे. परंतु बहुसंख्य लोक अटी पाळत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. मागील आठ दिवसात नागपुरात रुग्णांच्या संख्येने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. तब्बल ३१० रुग्णांची नोंद झाली. यात आज ५८ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्येची हजाराकडे वाटचाल आहे. एकूण रुग्णांची संख्या ९२१ वर पोहचली आहे.सतरंजीपुरा, मोमीनपुरा, नाईक तलाव-बांग्लादेशसह आता लष्करीबाग हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. या वसाहतीतून १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसापूर्वी लष्करीबाग येथील ५२ वर्षीय महिला मेयोत उपचारासाठी आली. या महिलेला लक्षणे असल्याने मेयोत भरती करून घेतले. दुसऱ्या दिवशी ही महिला पॉझिटिव्ह आली. यामुळे तिच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्यांना पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन करण्यात आले. यातील १३ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, ती महिला क्वारंटाईन नव्हती. ती स्वत:हून रुग्णालयात आली. यामुळे लष्करीबाग येथून रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मध्य व पूर्व नागपूरपासून कोरोनाची लागण आता उत्तर नागपूरकडे जात आहे. सतरंजीपुरा, मोमीनपुरा, गोळीबार चौक, टिमकी, भानखेडा, कमाल टॉकीज चौक, नाईक तलाव-बांग्लादेश आणि आता लष्करीबाग येथे रुग्ण दिसून येत आहे. हा दाट वसाहतींचा भाग असल्याने आरोग्य यंत्रणेला पुढील काही दिवस अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.

नाईक तलाव १३ तर शांतिनगर येथून १० रुग्णनाईक तलाव-बांग्लादेश येथून बुधवारी तब्बल ६१ रुग्ण पॉझटिव्ह आले असताना आज याच वसाहतीतून १३ रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्वच रुग्ण विविध ठिकाणी क्वारंटाईन होते. या शिवाय शांतिनगर येथून १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. मोमीनपुरा येथून पाच तर हंसापुरी येथून चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले होते.रेल्वे कॉलनी व भगवाघर परिसरातही रुग्णअजनी रेल्वे कॉलनीत पुन्हा एक रुग्ण मेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. या शिवाय गीतांजली चौक भगवाघर परिसरात पहिल्यांदाच पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. या पाचही रुग्णांना संशयित म्हणून पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.ग्रामीण भागात सहा रुग्ण पॉझिटिव्हशहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात वाडी दाभा येथील तीन, कोरोडी तालुक्यातील एक, काटोल तालुक्यातील रिजोरा गावात एक तर हिंगणा तालुक्यातील नीलडोह येथील एक रुग्ण आहे. विशेष म्हणजे, रिजोरा व नीलडोह गावातील रुग्णाने एका खासगी प्रयोगशाळेतून नमुन तपासून घेतला असताना अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला जिल्ह्यातून नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘सारी’वर उपचार घेत असलेल्या ५६ वर्षीय रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला.मेयोतून सहा रुग्णांना सुटीमेयोतून सहा रुग्णांन सुटी देण्यात आली. यात टिमकी येथील तीन, मोमीनपुरा येथील दोन तर एक रुग्ण प्रेमनगर येथील आहे. या रुग्णांना पुढील १४ दिवस ‘होम आयसोलेशन’मध्ये रहायचे आहे, तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. बरे होऊन घरी परतलेल्यांच संख्या आता ५४९ वर पोहचली आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १३९दैनिक तपासणी नमुने ३५८दैनिक निगेटिव्ह नमुने ३०४नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९२१नागपुरातील मृत्यू १५डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५४९डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३२९९क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २०६६पीडित- ९२१-दुरुस्त-५४९-मृत्यू-१५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर