शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

CoronaVirus in Nagpur : नागपुरात चार दिवसात २२२ रुग्ण,४६ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:01 PM

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील चार दिवसात २२२ रुग्णांची नोंद झाली. साडेतीन महिन्याच्या कालावधीतील ही सर्वात मोठी संख्या आहे. यात शनिवारी ४६ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १७२७ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या १७२७

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील चार दिवसात २२२ रुग्णांची नोंद झाली. साडेतीन महिन्याच्या कालावधीतील ही सर्वात मोठी संख्या आहे. यात शनिवारी ४६ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १७२७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, क्वारंटाईन असलेलेच संशयित रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला आहे. मध्यवर्ती कारागृहातील सात रुग्णांची पुन्हा शनिवारी नोंद झाली. येथील रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. शुक्रवारी ४२ बंदिवान पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक बंदिवान, दोन कारागृहातील कर्मचारी व चार त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक आहेत. कोरोनाबाधित अधिकारी, नातेवाईक, कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांवर मेयो, मेडिकल व एम्समध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत बंदिवानांना कारागृहातीलच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. शनिवारी या सर्वांना एक्स-रे, रक्ताची चाचणीसाठी मेयो व मेडिकलमध्ये पाठविण्यात आले.कामठी, रामटेक, काटोलमध्ये रुग्णमेयोच्या प्रयोगशाळेत आज १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात कारागृहातील सात, मिल्ट्री हॉस्पिटल कामठी येथील चार, रामटेक येथील तीन झिंगाबाई टाकळी येथील एक, रेल्वे अजनी क्वॉर्टसमधील एक तर एक रुग्ण काटोल येथील आहे. एम्समधून १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील सहा रुग्ण व्हीएनआयटी, सहा मॉरिस कॉलेज तर दोन रविभवन येथील क्वारंटाईन सेंटरमधील आहेत. नीरीच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेले सहा रुग्ण पाचपावली क्वारंटाईन सेंटर येथील आहेत. माफसूच्या प्रयोगशाळेतून दोन, तर खासगी लॅबमधून सात रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.२४ रुग्णांना डिस्चार्जमेयोमधून बरे झालेल्या १० रुग्णांना सुटी देण्यात आली. हे रुग्ण कळमना, बुटीबोरी, मिनीमातानगर, मोमीनपुरा, टिमकी, वाठोडा, व हिंगणा येथील आहेत. मेडिकलमधून नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यात नाईक तलाव गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंद्रमणीनगर, अमरावती येथील रुग्ण आहेत. एम्समधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली, हे सर्व रुग्ण गणेशपेठ येथील आहेत. एकूण २४ रुग्णांना सुटी देण्यात आली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३३५ झाली आहे.संशयित : १८२२अहवाल प्राप्त : २६६१६बाधित रुग्ण : १७२७घरी सोडलेले : १३३५मृत्यू : २५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर