शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Coronavirus Live update : धोका वाढला! कोरोनाचा हाहाकार; नागपूरात अनेक रुग्णालयांत बेड्सची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 14:35 IST

देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये नागपूरचाही समावेश आहे. काल नागपूर जिल्ह्यात जवळपास 3700 नवे रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. सध्या नागपुरात तब्बल 34 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. (Corona virus cases in Nagpur)

नागपूर- कोरोना व्हायरसने देशात पुन्हा एकदा हाहाकार घालायला सुरुवात केली आहे. जवळपास पाच महिन्यांनंतर देशात एकाच दिवसांत पंन्नास हजारहून अधिक रुग्ण समोर आले. सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रात 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. यातच आता नागपुरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच रुग्णालयांत बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. (Corona virus cases surge in Nagpur, shortage of beds reported in some hospitals)

नागपूर GMC च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांत 600 बेड्स आहेत. मात्र, यांपैकी 90 बेड्स बेसमेंटमध्ये आहेत. हे बेड्स ड्रेनेजच्या समस्येमुळे बंद करण्यात आले आहेत. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत होतो. मात्र, आता बेड्स मिळू शकले आहेत. 

CoronaVirus Vaccine Update : आता भारत कोरोना लशीची निर्यात वाढवणार नाही! देशांतर्गत मागणीवर लक्ष केंद्रित

देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये नागपूरचाही समावेश आहे. काल नागपूर जिल्ह्यात जवळपास 3700 नवे रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. सध्या नागपुरात तब्बल 34 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

Coronavirus: धक्कादायक! कोरोनापासून वाचवणाऱ्या सॅनिटायझरने होऊ शकतो कॅन्सर! 44 हॅन्ड सॅनिटायझर अत्यंत घातक31 मार्चपपर्यंत लॉकडाउन -कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात 31 मार्चपपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. केवळ नागपूरच नाही, तर बीड आणि नांदेडमध्येही संपूर्ण लॉकडाउनचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय राज्यात इतरही अनेक शहरांत लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यूसारखी बंदी घालण्यात आली आहे.

देशात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 504.4 वरून 202.3 दिवसांवर - देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 504.4 दिवसांवरून 202.3 दिवसांवर आला आहे. 1 मार्चला हा कालावधी 504 दिवस होता तो आता 23 मार्चला 202 दिवस झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहा राज्यांत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांचे प्रमाण एकूण देशातील प्रमाणाच्या 80.90 टक्के आहे. 22 मार्चला 32.53 लाखांहून अधिक लोकांनी लसीचा डोस देण्यात आला आहे. एकाच दिवसातील ही सर्वांत मोठी संख्या आहे. महाराष्ट्रानंतर पंजाबमध्ये 2,299 रुग्ण असून गुजरातेत 1,640 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक , हरियाणा व राजस्थान या राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारीच्या मध्यावधीत भारतात नीचांकी रुग्ण संख्या होती.

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर