रशियातून आलेल्या कोरोना संशयिताला रेल्वेतून नागपुरात उतरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 15:32 IST2020-03-22T15:32:00+5:302020-03-22T15:32:22+5:30
दिल्ली -चेन्नई राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करीत असलेल्या एका कोरोना संशयिताला नागपुरात रेल्वे पोलिसांनी उतरवून घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

रशियातून आलेल्या कोरोना संशयिताला रेल्वेतून नागपुरात उतरवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दिल्ली -चेन्नई राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करीत असलेल्या एका कोरोना संशयिताला नागपुरात रेल्वे पोलिसांनी उतरवून घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
विजयवाडा येथील एक २० वर्षांचा युवक रशियातील मॉस्को येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो शनिवारी दिल्लीत आला. तेथे त्याची प्रकृती बिघडली. वैद्यकीय तपासणीत त्याच्या हातावर संशयित असल्याचा शिक्का मारला व त्याला प्रवास न करण्याचा सल्ला दिला गेला. मात्र तो राजधानी एक्सप्रेसने विजयवाडाकडे निघाला होता. इटारसीजवळ त्याच्या हातावर असलेला शिक्का एका सहप्रवाशाला दिसल्यानंतर त्याने ही बाब गाडीतील तिकीट तपासनीसाच्या निदर्शनास आणून दिली. या युवकाला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले असून त्याला कोरोना संशयितांसाठी राखीव असलेल्या आमदार निवासात ठेवण्यात आले आहे.