कोरोनाचा धुमाकूळ, ६,५८९ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:26+5:302021-04-10T04:08:26+5:30

नागपूर : कोरोनाने नागपूर जिल्हात धुमाकूळ घातला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. शुक्रवारी ६,५८९ नव्या रुग्णांची ...

Corona surge, 6,589 new patients added | कोरोनाचा धुमाकूळ, ६,५८९ नव्या रुग्णांची भर

कोरोनाचा धुमाकूळ, ६,५८९ नव्या रुग्णांची भर

नागपूर : कोरोनाने नागपूर जिल्हात धुमाकूळ घातला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. शुक्रवारी ६,५८९ नव्या रुग्णांची भर पडली. शिवाय, २४ तासांत ६४ रुग्णांचा जीव गेल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. रुग्णांची एकूण संख्या २,६६,२२४ झाली असून मृतांची संख्या ५,६४१ वर पोहचली. धक्कादायक म्हणजे, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत ४,२५० ने वाढ झाली. सध्याच्या स्थितीत ४९,३४७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

एकीकडे कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असताना दुसरीकडे वैयक्तिक कर्तव्यात अजूनही बरेच नागरिक कसूर करीत असल्याचे भयानक चित्र आहे. विना मास्क, विना शारीरिक अंतर व विना सॅनिटायझेशनमुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आता औषधोपचाराचाही तुटवडा पडल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. स्वत:हून जबाबदारी न घेतल्यास हे संकट आणखी गडद होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

-चाचण्यांची विक्रमी नोंद

शुक्रवारी रुग्णसंख्येसोबतच चाचण्यांचीही विक्रमी नोंद झाली. २२,७९७ चाचण्या झाल्या. यात १७,०४२ आरटीपीसीआर तर ५,७५५ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. यातून १६,३०८ संशयितांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. सर्वाधिक , २५२३ चाचण्या मेडिकलमध्ये झाल्या. मेयोमध्ये २३०४, एम्समध्ये १९८३, नीरीमध्ये ३३९, खासगी लॅबमध्ये ८९९७ चाचण्या झाल्या. या चाचण्या मागील २४ तासांतील आहेत.

-शहरात ४०१६ तर ग्रामीणमध्ये २४६६ रुग्ण पॉझिटिव्ह

शहरात पहिल्यांदाच एका दिवसातील बाधितांची नोंद ४ हजारांवर गेली. ४,०१६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ग्रामीणमध्ये २,४६६ बाधित रुग्ण आढळून आले. मृतांमध्ये शहरातील ३७ तर, ग्रामीणमध्ये २० मृत्यू आहेत. जिल्ह्याबाहेरील ७ रुग्ण व ७ मृत्यू नोंदविण्यात आले.

-३६,६११ रुग्णांचे घरीच उपचार

कोरोनाचे ४९,३४७ रुग्ण सक्रिय असून यातील ३६,६११ रुग्णांचे घरीच उपचार सुरू आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये १२,७३६ रुग्ण उपचाराखाली आहेत. आज २,१७५ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २,११,२३६ झाली. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनामुक्त होण्याचा दर घसरून ७९ टक्क्यांवर आला आहे.

-१५ दिवसांतील रुग्णसंख्येची विक्रमी नोंद

२६ मार्च : ४०९५

२ एप्रिल : ४११०

७ एप्रिल : ५३३८

८ एप्रिल : ५५१४

९ एप्रिल : ६४८९

::कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या: २२,७९७

ए. बाधित रुग्ण :२,६६,२२४

सक्रिय रुग्ण : ४९,३४७

बरे झालेले रुग्ण :२,११,२३६

ए. मृत्यू : ५,६४१

Web Title: Corona surge, 6,589 new patients added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.