शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

१० हजारात कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह : पॅथॉलॉजी लॅबमध्ये सुरू आहे गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 12:31 AM

Corona report negative at 10 thousand शहरातील काही पॅथॉलॉजी लॅब व कोरोना टेस्टींग लॅबमध्ये १० हजार रुपये घेऊन कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात येत आहे. या पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून विदेशात जाणाऱ्यांना लुटण्यात येत आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील काही पॅथॉलॉजी लॅब व कोरोना टेस्टींग लॅबमध्ये १० हजार रुपये घेऊन कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात येत आहे. या पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून विदेशात जाणाऱ्यांना लुटण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह याविषयीचा खुलासा केला.

शिवणकर म्हणाले की, विदेशात जाण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह नसल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या लॅब अशाच लोकांना ‘टार्गेट’ बनवत आहेत. त्यांच्याकडून १० हजार रुपये मागितले जात आहेत. ११ मार्च रोजी एका व्यक्ती ज्याला कुठलेही लक्षण नव्हते, तो रामदास पेठेतील एका बायो पॅथमध्ये जातो. त्याला दुबईला जायचे होते. त्याचदिवशी त्याला हैद्राबाद येथेही निघायचे होते. दुसऱ्या दिवशी त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, तरीही ती व्यक्ती हैद्राबादला पोहोचली होती. रिपोर्ट आल्यानंतर लगेचच लॅबमधून एका कर्मचाऱ्याचा फोन आला. तो म्हणाला, ‘निगेटिव्ह रिपोर्ट पाहिजे असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील.’ पैसे दिल्यानंतर त्या व्यक्तीला हैद्राबाद येथे असतानाही निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात आला. दुबईत पोहोचल्यानंतर त्याची पुन्हा चाचणी झाली, तेथील रिपोर्ट निगेटिव्ह आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे की, कुठल्याही प्रकारचे लक्षण नसतानाही पॉझिटिव्ह दाखवले जात आहे. महापालिकेलाही चुकीची माहिती दिली जात आहे. त्यामुळे अशा लॅबवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. शिवणकर यांनी शहरातील अन्य लॅबकडूनही असा गौरखधंदा केला जात असण्याची शक्यता वर्तवली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण नागपूर अध्यक्ष विशाल खांडेकर, अशोक काटले व मेहबूब पठाण उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfraudधोकेबाजी